मुंबई : बऱ्याच दिवसानंतर पुन्हा जगातील सर्वोत्तम सलामीवीर जोडी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात दोघेही इनिंगची सुरुवात करतील. 5 मार्च ते 21 मार्च या कालावधीत एकूण 6 संघ या मालिकेमध्ये भाग घेत आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही मालिका खेळली जाणार आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आजपासून सुरू होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना बांगलादेश संघाशी होईल. रायपुरातील शहीद वीरनारायण स्टेडियमवर बहुप्रतिक्षित मालिका सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते मालिकेचा शुभारंभ होणार आहे. या मालिकेत भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू सहभागी होतील.
या मालिकेत केवळ क्रिकेटला अलविदा म्हणणार्या दिग्गजांचा समावेश आहे. अलीकडेच भारताचा अष्टपैलू युसुफ पठाण, वेगवान गोलंदाज आर विनय कुमार आणि यष्टीरक्षक नमन ओझा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. ते सर्व या मालिकेत खेळताना दिसतील. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युवराज सिंग हे मोठे खेळाडू या सीरीजमध्ये खेळताना दिसणार आहेत.
वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स, इंग्लंडचा केविन पीटरसन आणि बांगलादेशचा मोहम्मद नाझीमुद्दीन अशी अन्य मोठी नावे आहेत. आज संध्याकाळी भारत पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. 9 आणि 13 मार्च रोजी भारतीय संघाचे पुढचे सामने होणार आहेत. मालिकेचा उपांत्य सामना 17 आणि 19 मार्च रोजी खेळला जाईल. 21 मार्चला फायनल सामना रंगणार आहे.
संघांची नावे :
इंडिया लेजेंड्स - India Legends
श्रीलंका लेजेंड्स Sri Lanka Legends
वेस्ट इंडिज लेजेंड्स West Indies Legends
दक्षिण आफ्रिया लेजेंड्स South Africa Legends
बांगलादेश लेजेंड्स Bangladesh Legends
इंग्लंड लेजेंड्स England Legends
इंडिया लेजेंड्स: सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोनी.
लाईव्ह टेलिकास्ट : COLORS Cineplex, COLORS Kannada Cinema, FTA channel Rishtey Cineplex, Voot and Jio apps
किती वाजता : संध्याकाळी 7.00 वाजता