ऋषभ पंतने घेतली नवीन मर्सिडीज कार पाहा व्हिडिओ....

 टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय क्रिकेटमधील आगामी स्टार म्हणून पाहिले जात आहे. या तुफानी फलंदाजाने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या मर्सिडीज कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 29, 2017, 06:36 PM IST
 ऋषभ पंतने घेतली नवीन मर्सिडीज कार पाहा व्हिडिओ.... title=

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय क्रिकेटमधील आगामी स्टार म्हणून पाहिले जात आहे. या तुफानी फलंदाजाने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या मर्सिडीज कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 

या व्हिडिओमध्ये ऋषभ स्वतः ही मर्सिडीज कार चालवताना दिसत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ऋषभची ही कार ताशी १३३ किलोमीटरचा स्पीडने रस्त्यावर धावत आहे. तसा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. 

 

 

proud of u @rishabpant #NewCar 

A post shared by Rishabh Pant FAN Culb (@rishabpant777) on

अंडर १९ मध्ये शानदार कामगिरी 

ऋषभने अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दिल्लीकडून रणजी ट्रॉफीमध्ये खूप मोठ्या खेळी केल्या होत्या. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एक मॅच खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली होती. 

 

 

❤❤ #NewCar @rishabpant

A post shared by Rishabh Pant FAN Culb (@rishabpant777) on

सचिननेही केले कौतुक 

पंत जलद गतीने धावा काढतो त्याचे कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केले आहे. गुजरात लायन्स विरोधात त्याने केलेल्या ९७ धावाच्या खेळीचा उल्लेख सचिनने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चांगली खेळी म्हटले आहे.