Rishabh Pant : भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे गंभीर अपघात झालाय. रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारने (Rishabh Pant Accident) पेट घेतला आणि काही क्षणात गाडीचा अक्षरशः कोळसा झाला. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातानंतर लगेचच पंत गाडीच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पंतवर सध्या देहरादून येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र या अपघतानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir On Team India Selection) आधी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 3 जानेवारीपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. या मालिकेसाठी अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने या मालिकेसाठी संघ निवडीवर मोठे वक्तव्य केले आहे.
हे ही वाचा >> ऋषभ पंत याच्या कारचा स्पीड ताशी 200 किमी, पाहा व्हिडिओ
या दोन्ही मालिकांसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. या दोन्ही मालिकेसाठी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. पंतवर सध्या गुढघ्याच्या दुखापतीमुळे उपचार सुरु आहेत. मात्र या मालिकेसाठी पंतला विश्रांती नाही तर वगळण्यात आले आहे, असे गौतम गंभीरने म्हटलं आहे.
विश्रांती नावाचा हा शब्द खूप छान
"सगळ्यात आधी त्याला विश्रांती देण्यात आली की वगळण्यात आले आहे हे निवडकर्त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. माझ्या मते त्याला वनडे क्रिकेटमधून वगळण्यात आले आहे. मात्र त्याबाबत पुरेशी स्पष्टता आलेली नाही. विश्रांती नावाचा हा शब्द खूप छान आहे पण आम्ही खेळत असताना तो नव्हता. एकतर आम्हाला काढून टाकले जायचे किंवा निवडले जायचे," असे गौतम गंभीरने ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट
पंतवर देहरादून येथे उपचार सुरु
दरम्यान, दिल्लीहून रुडकीला येत असताना पहाटे साडेपाच वाजता पंतच्या गाडीला गंभीर अपघात झाला. रुडकीच्या 20 किमी आधीच कार दुभाजकाला धडकली आणि उलटून दुसऱ्या बाजूला गेला. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला. पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवली. गाडीत तीन जण होतो आणि सर्वांचा जीव वाचल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरुवातीला तिघांनाही जवळच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथून त्याला देहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले.