Rishabh Pant: अरे या पंतचं करायचं काय? पुन्हा फेल गेल्यावर इंटरनेटवर मिम्सचा धुमाकूळ!

Rishabh Pant IND vs NZ: ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आणि तो 6 धावा करून बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Memes On Rishabh Pant) विविध प्रतिक्रिया दिल्या. 

Updated: Nov 20, 2022, 09:09 PM IST
Rishabh Pant: अरे या पंतचं करायचं काय? पुन्हा फेल गेल्यावर इंटरनेटवर मिम्सचा धुमाकूळ! title=
Rishabh Pant troll on social media

Rishabh Pant IND vs NZ 2nd T20I:  भारत आणि न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात (India vs New Zealand) भारताने न्यूझीलंडचा दारूण पराभव केला. या सामन्यात सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) वादळी खेळी करत दमदार शतक ठोकलं. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. मात्र, या सामन्या इतर खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यात खासकरून निशाण्यावर ठरतोय तो भारताचा विकेटकिपर (Rishabh Pant) फलंदाज रिषभ पंत...

ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आणि तो 6 धावा करून बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Memes On Rishabh Pant) विविध प्रतिक्रिया दिल्या. पंत 13 चेंडूंचा सामना करत बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी पंतला निशाण्यावर घेतलं आणि ट्रोल केलंय. 

पंत बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसत नाही. या कारणामुळे तो ट्रोल होतोय. या सामन्यासाठी भारताने संजू सॅमसनला (Sanju Samson) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिण्यात आलं नव्हतं. वर्ल्ड कपमधील फेल गेल्यानंतर देखील रिषभला संधी दिली. त्यामुळे संजू सॅमसनला संधी मिळाली नाही.

आणखी वाचा - Shaheen Afridi ला झालंय काय? म्हणतोय "दुआ में याद रखना"

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक भन्नाट मिम्स (Memes On Social Media) व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पंतला संधी मिळणार की संजू सॅमसनला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सध्या नेटकरी रिषभ पंतवर कडाडून टीकास्त्र चालवताना दिसत आहेत.