IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.

Updated: Dec 25, 2022, 04:19 PM IST
IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ title=

IND vs BAN 2nd Test: भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा (team India) विजय झाला. अश्विनने शेवटच्या टप्प्यात सलग दोन फोर मारत टीमला झंझावाती विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीपूर्वी (Virat Kohli) अक्षर पटेलला (Axar Patel) पाठवण्यात आलं होतं. यामुळे टीम इंडियावर टीका होताना दिसतेय. 

गावस्कर आणि जडेजा यांनी केली टीका

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि अजय जडेजा यांनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका केली आहे. दोघांनीही केएल राहुल आणि कोच राहुल द्रविड यांना चांगलच सुनावलं आहे. जडेजाच्या म्हणण्यानुसार, जर लेफ्ट आणि राईट हँड फलंदाजी कॉम्बिनेशनसाठी करण्यात आलं असेल, तर मग ऋषभ पंत काय झोपेच्या गोळ्या घेऊन झोपा काढतोय का? अशा तीव्र शब्दात जडेजा यांनी फटकारलंय.

गावस्कर आणि जडेजा एका स्पोट्स चॅनेलच्या हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये होते. त्यावेळी तिसऱ्या दिवसाताचा खेळ संपल्यानंतर त्यांनी अशा टीका केल्या आहे. 

गावस्कर म्हणाले की, हा विराट कोहलीसाठी योग्य मेसेज नाहीये. तो जगातील सर्वात उत्तम फलंदाज आहे. हा जर विराटने स्वतः असं करायला सांगितंल असेल, तर ही बाब वेगळी आहे. ड्रेसिंग रूममध्ये काय झालं, याची माहिती नाही. पण हा निर्णय समजण्यासाठी कठीण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, अक्षर चांगला खेळतो, यामध्ये दुमत नाही.

टीम इंडियाचा विजय

बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे.

टीम इंडियाने हा सामना जिंकला

145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच वाईट झाली होती. केएल राहुल आणि शुभमन गिल लगेचच बाद झाले. तर केएल राहुलने 2 आणि शुभमन गिलने 7 धावा केल्या. विराट कोहलीला केवळ एकच धाव करता आली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने 40 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने अवघ्या 45 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात मेहदी हसनने आपली किलर गोलंदाजी सुरू ठेवली आणि शानदार फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने धोकादायक दिसणाऱ्या ऋषभ पंतला 9 धावांवर बाद केले.