ऋषभ पंतकडून कॅच सुटला आणि बॉल Rohit Sharma च्या नको त्या ठिकाणी...; Video व्हायरल

भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत एक घटना घडली. या घटनेने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Updated: Oct 3, 2022, 03:16 PM IST
ऋषभ पंतकडून कॅच सुटला आणि बॉल Rohit Sharma च्या नको त्या ठिकाणी...; Video व्हायरल title=

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबर रोजी एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत एक मजेदार घटना घडली. या घटनेने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टॉस जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, परंतु निर्णय त्याच्या बाजूने गेला नाही. 

Rohit Sharma च्या प्राइवेट पार्टवर लागला बॉल

या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 237 रन्स केले. त्याचवेळी या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी समोरची टीम सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसली. दीपक चहरने पहिल्या ओव्हरमध्ये एकही रन दिला नाही.

पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर फलंदाज टेम्बा बावुमाला बॉलला मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल विकेटकीपर ऋषभ पंतच्या दिशेने गेला. ऋषभला कॅच पकडायचा होता. मात्र कॅच पकडण्याच्या नादात बॉल स्लिप पोझिशनवर उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या प्रायव्हेट पार्टला लागला. यानंतर भारतीय कर्णधार खूप वेदना झाल्याचं दिसून आलं.

रोहितचा मोठा विक्रम

दरम्यान कालच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये खेळताना एकूण 400 टी-20 सामने खेळले आहेत. यामधील भारतासाठी 141 सामने, आयपीएलमध्ये मुंबईकडून 191 तर डेक्कन चार्जसतर्फे 47 सामने आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करताना 17 आणि इंडियन संघासाठी अधिकृत 2 आणि इंडिया एसाठी 2 असे रोहितने 400 सामने खेळले आहेत. 

रोहितने आपल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये टी-20 मध्ये 400 सामने खेळताना 10,578 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 6 शतक 71 अर्धशतकं ठोकली आहेत.  आजच्या सामन्यामध्ये रोहितने 43 धावा केल्या.