Rishabh Pant In T20 World Cup Race : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आता काऊंटडाऊन सुरू झालंय. मात्र, अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळणार? विकेटकिपर कोण असणार? असा सवाल विचारला जात होता. रोहित शर्माला देखील यावरून टेन्शन होतं. मात्र आता रोहितचं टेन्शन खल्लास झालंय. कारण टीम इंडियाला आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) विकेटकिपर फलंदाज मिळाला आहे. होय, टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) निश्चितपणे सिद्ध केलंय की तो किती चांगला फॉर्ममध्ये आहे. गुजरातविरुद्ध ऋषभने अविश्वसनीय खेळी केली. मोहित शर्माला (Mohit Sharma) ऋषभने धु धु धुतलाय.
नेमकं काय झालं?
दिल्लीने 19 ओव्हरमध्ये 193 धावा कुटल्या होत्या. त्यावेळी ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स मैदानात होते. या दोघांनी दिल्लीला 200 च्या जवळ आणलं. परंतू
ऋषभने अखेरच्या ओव्हरमध्ये घाव घालण्याचा निर्णय घेतला अन् अखेरच्या ओव्हरमध्ये मोहित शर्माला तब्बल 31 धावा चोपल्या. यामध्ये त्याने 4 सिक्स अन् एक फोर मारला. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे दिल्लाला 224 धावा रचता आल्या.
पाहा Video
Jaise guru, waise shishya #DCvGT #TATAIPL #IPLonJioCinema #IPLinHindi pic.twitter.com/wBtuLmlqiv
— JioCinema (@JioCinema) April 24, 2024
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी गमावून 224 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी वादळी खेळी खेळली. ऋषभ पंतने 43 चेंडूत 88 धावांची नाबाद खेळी केली. या काळात त्याने 8 षटकार आणि 5 चौकार मारले. तर अक्षरने 43 चेंडूत 66 धावा केल्या. शेवटी ट्रिस्टन स्टब्स आला आणि त्याने 7 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. गुजरातसाठी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरने जबरदस्त गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर फिरकी गोलंदाज नूर अहमदने 1 बळी घेतला.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्सिया, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद आणि संदीप वॉरियर.