नवी दिल्ली : आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून दिल्लीची टीम याआधीच बाहेर झाली आहे. पण दिल्लीचा विकेट कीपर ऋषभ पंतनं यावर्षी जबरदस्त रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. विकेट कीपर म्हणून एका मोसमामध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम पंतनं केला आहे. पंतनं या आयपीएलमध्ये एकूण ६८४ रन केल्या आहेत. ऋषभ पंतनं रॉबिन उथप्पाचं सर्वाधिक ६६० रनचं रेकॉर्ड मोडलं आहे. २०१४ साली उथप्पानं हे रेकॉर्ड केलं होतं. पंतचं हे रेकॉर्ड के.एल.राहुलही मोडू शकतो. राहुलनं या मोसमात ६५२ रन केल्या आहेत आणि अजून पंजाबची मॅच चेन्नईशी होणार आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये ऋषभ पंतनं ४४ बॉलमध्ये ६४ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.
ऋषभ पंत- ६८४ रन- २०१८
रॉबिन उथप्पा- ६६० रन- २०१४
के.एल.राहुल- ६५२ रन- २०१८
जॉस बटलर- ५४८ रन- २०१८
दिनेश कार्तिक- ५१० रन- २०१३
ऍडम गिलख्रिस्ट- ४९५ रन- २००९