Urvashi Rautela: ऋषभ पंत हॉस्पिटलमध्ये असताना उर्वशीने शेअर केला 'तो' फोटो!

Rishabh Pant Car Accident: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'आरपी'मधील (RP) गोंधळ सर्वांना माहिती आहे. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा झाली होती.

Updated: Jan 1, 2023, 11:07 PM IST
Urvashi Rautela: ऋषभ पंत हॉस्पिटलमध्ये असताना उर्वशीने शेअर केला 'तो' फोटो! title=
Rishabh Pant, Urvashi Rautela

Urvashi Rautela Instragram Post: भारतीय संघाचा (Team India) स्टार अष्टपैलू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाला होता. त्यानंतर आता त्याच्यावर मॅक्स हॉस्पिटलमध्ये (MAX Hospital) उपचार सुरू आहे. त्यामुळे ऋषभचे चाहते टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) एक पोस्टमुळे चर्चेला उधाण आलंय. (Rishabh Pant Car Accident Urvashi Rautela Troll On Instagram marathi News )

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'आरपी'मधील (RP) गोंधळ सर्वांना माहिती आहे. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. अशातच मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काहीच नसल्याचं दोघांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा सतत होताना दिसते. अशातच ऋषभ रुग्णालयात असताना उर्वशीची पोस्ट ट्रोल (Urvashi Rautela Instragram Post) होताना दिसत आहे.

आणखी वाचा - Sana Saeed engaged: 'कुछ कुछ होता है' मधील अंजलीने केला 'या' हॉलिवूड कलाकाराशी साखरपुडा; Video Viral

उर्वशीने तिचा नवा फोटो इंस्टाग्रामवर (Urvashi Rautela Instragram) शेअर केला आहे. मगरीच्या डिझाईनच्या नव्या दागिन्यांसह तिचा फोटो (Urvashi Rautela Photo) पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकीकडे आमचा भाऊ ऋषभ हॉस्पिटलमध्ये असताना मॅडमचा फॅशन शो चालू आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

पाहा पोस्ट - 

दरम्यान, शेअर केलेल्या पोस्टमध्ये (Urvashi Rautela Troll On Instagram) उर्वशी गॉगल घातलेली दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाच्या सूटसोबत मगरीचे दागिने गळ्यावर धारण केलेत. नेकपीस, कानातले, ब्रेसलेटमध्ये मगरीचे डिझाईन (Crocodile design) दिसत आहे. तिच्या या पोस्टवर संतापजनक कमेंट पाहून अनेकांचे डोळे चक्रावले आहेत.