मुंबई : पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात 54 धावांनी बंगळुरूला पराभव स्वीकारावा लागला. बऱ्याचदा मॅचमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. मात्र या मॅचमध्ये काहीतरी अजबच घडलं. चक्क मॅच पाहायला न बोलवलेला पाहुणाच पोहोचला. काळ्या रंगाची मांजर चक्क मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये घुसली.
ही मांजर नुसती घुसली नाही तर काहीवेळ ती मॅच पाहात होती. इकडे तिकडे पाहून झाल्यानंतर ती जागेवरून उठली आणि ती स्टेडियममध्ये फिरायला निघाला. हा संपूर्ण प्रकार पंजाब विरुद्ध बंगळुरू सामन्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की काळ्या रंगाची मांजर मॅच पाहाताना दिसत आहे. तिला पाहून फाफ ड्यु प्लेसिसला हसू आवरलं नाही. या मांजरीला पाहून लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्सही त्यावर केल्या आहेत.
आयपीएलच्या 60 व्या सामन्यात पंजाबने बंगळुरूवर 54 धावांनी विजय मिळवला. पंजाबची प्लेऑफची आशा वाढली आहे. तर बंगळुरूला टफ फाईट पंजाब देत आहे. त्यामुळे प्लेऑफची रेस अधिक चुरशीची होणार आहे.
पंजाबने 9 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूला 9 विकेट्स गमावून 155 धावा करता आल्या. या मॅचमध्ये काळा रंगाच्या मांजरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ती चर्चेचा विषय ठरली. मांजरीमुळे काही वेळ सामना थांबवावा लागला होता.
— Varma Fan (@VarmaFan1) May 13, 2022