कोहली लाडका असूनही रवी शास्त्रींसाठी 'हा' खेळाडूच BEST, असं का?

रवि शास्त्री आणि कोहलीची जोडी नेहमी चर्चेत असते मात्र असं असताना शास्त्री का म्हणतात 'या' खेळाडूला बेस्ट

Updated: Jul 5, 2022, 10:25 AM IST
कोहली लाडका असूनही रवी शास्त्रींसाठी 'हा' खेळाडूच BEST, असं का? title=

मुंबई : रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची जोडी सुपरहिट आहे. शास्त्रींचा लाडका खेळाडू म्हणूनही कोहलीकडे अनेकदा पाहिलं जातं. त्यांची जोडी जगभरात प्रसिद्ध असताना आता एक मोठी बातमी येत आहे. रवी शास्त्रींच्या दृष्टीनं कोहलीपेक्षाही आणखी एक खेळाडू सर्वश्रेष्ठ फलंदाजी करतो. त्याला ते बेस्ट खेळाडू म्हणतात हा खेळाडू कोण आहे? रवी शास्त्री त्याला बेस्ट का म्हणतात जाणून घेऊया.

भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यासाठी रवी शास्त्री कॉमेंट्री करतात. यावेळी त्यांनी मॅचदरम्यान बेस्ट खेळाडू कोण याबाबत एक वक्तव्य केलं. ते चर्चेचा विषय ठरत आहे. या खेळाडूच्या स्वीप शॉटने रवी शास्त्रींना वेड लावलं आहे. 

विराट कोहली की इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सर्वोत्तम फलंदाज कोण? यावरून नेहमी चर्चा होत असते. नुकत्याच सुरु असलेल्या कसोटी सामन्यात याचं उत्तर मिळालं आहे. विराट कोहलीला या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. तर जो रूटने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी तो ७६ धावांवर नाबाद राहिला. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केलं. 39 व्या ओव्हरदरम्यान त्यांनी कौतुक केलं. 

39 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जो रूटने स्वीप शॉट मारला त्यावर 4 धावा मिळवल्या. स्वीप शॉट खेळण्यात जो रूटला मी जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणेन असं कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले. या यादीमध्ये विराट कोहली, केन विलियमसन, स्टीव स्मिथ यांच्या नावांचाही समावेश आहे. मात्र जो रूटचं खेळण्याचं कौशल्य आणि त्याची कामगिरी सर्वोत्तम आहे. 

स्पिन बॉलला तो खूप उत्तम स्वीप करतो. त्यामुळे तो जगातला सर्वोत्तम खेळाडू आहे असं मला वाटतं असं रवी शास्त्री कॉमेंट्री करताना म्हणाले. टीम इंडियाने इंग्लंडला 378 धावांचं आव्हान दिलं आहे. चौथा दिवस अखेर इंग्लंडने 3 विकेट गमावून 260 धावा केल्या आहेत. आता इंग्लंडला विजयासाठी 118 धावांची गरज आहे. टीम इंडियावर पराभवाचं संकट आहे. पाचवा दिवस दोन्ही टीमसाठी निर्णायक असणार आहे.