साक्षीआधी 'ही' अभिनेत्री धोनीवर जीव ओवाळून टाकायची!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे अनेक अफेयर्स चर्चेत होते. 

Updated: Jul 4, 2022, 08:22 PM IST
साक्षीआधी 'ही' अभिनेत्री धोनीवर जीव ओवाळून टाकायची! title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानासह मैदानाबाहेरही कुल असायचा. याच कारणामुळे त्याचे अनेक अफेयर्स चर्चेत होते. आता त्याच्या एका अभिनेत्रीसोबतच्या अफेयरची चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री धोनीवर जीव ओवाळून टाकायची. ही अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊयात.

एमएस धोनीचे साक्षीसोबत लग्न होण्यापुर्वी दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. लक्ष्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची लव्हस्टोरीही खूप गाजली होती. 2008 च्या आयपीएल दरम्यान दोघांची भेट झाली होती. या दरम्यान त्यांच्या लिंकअपची बातमी समोर आली होती.

कोण आहे अभिनेत्री?
राय लक्ष्मी हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. हिंदी प्रेक्षकांमध्ये अनेक लोक तिला फक्त भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने ओळखतात. राय लक्ष्मी 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड अॅम्बेसेडर बनली होती.यावेळी धोनी या संघाचा कर्णधार होता. या दरम्यानच दोघांची भेट झाली होती.  येथून दोघांचे प्रेम वाढू लागले होते.  

अफेयर्सची चर्चा 
धोनी आणि राय लक्ष्मी यांच्या लिंकअपच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळत होत्या. मात्र, लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले.'धोनी आणि राय लक्ष्मीच्या ब्रेकअप होण्यामागचे कारण काय होते हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. काही काळापूर्वी अभिनेत्रीने धोनीचे नाते ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. त्या गोष्टीला आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत आणि आता लोकांनी याबद्दल चर्चा करणे थांबवावे, असेही राय लक्ष्मी यांनी म्हटले आहे.

चित्रपट कारकिर्द 
राय लक्ष्मीचा जन्म ५ मे १९८९ रोजी कर्नाटकात झाला. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'करका कसादरा' या तमिळ चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2016 मध्ये रिलीज झालेल्या सोनाक्षी सिन्हाच्या 'अकिरा' चित्रपटात राय लक्ष्मी मायाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीत 'जुली 2' आणि 'ऑफिसर अर्जुन सिंग आयपीएस बॅच 2000' या चित्रपटांमध्येही दिसली.

अफेयर्सची चर्चा नाकारली
2010 मध्ये महेंद्रसिंग धोनीने साक्षीशी लग्न केले. धोनीला जीवा नावाची लाडकी मुलगी देखील आहे.धोनीच्या लग्नानंतर राय लक्ष्मीने दोघांमध्ये प्रेम नसल्याचे सांगितले होते. दोघे चांगले मित्र होते आणि एकमेकांना कधीच डेट केले नसल्याचे तिने सांगितले होते.  लक्ष्मी पुढे म्हणाली, 'धोनी संघाचा भाग होता, त्यामुळे आम्ही एका वर्षापेक्षा कमी काळ एकत्र राहिलो.' लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीही एकमेकांशी कोणतीही कमिटमेंट केली नाही किंवा लग्नाचा विचारही केला नाही.ती धोनीला चांगली ओळखते, पण ती याला कोणत्याही नात्याचे नाव देऊ शकत नाही. दोघे अजूनही एकमेकांचा आदर करतात, असे लक्ष्मी म्हणाली होती.