मुंबई : फास्ट बॉलर्सनी स्टंप तोडल्याचे व्हिडिओ आपण कित्येक वेळा पाहिले आहेत. पण अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशीद खाननं बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये स्टंप तोडल्याचा पराक्रम केला आहे. राशीद खान कोमिलिया विक्टोरियंससाठी खेळत होता. राशीदनं दिलशान मुनावीराला १६व्या ओव्हरचा दुसरा बॉल टाकला. मुनावीरा या लेग स्पिनला खेळण्याचा प्रयत्न करत होता पण यामध्ये बॉल मधल्या स्टंपला लागला. यामध्ये स्टंपचे दोन तुकडे झाले.
मागच्या काही दिवसांमध्ये १९ वर्षांचा राशीद खान क्रिकेट जगतामध्ये धोकादायक स्पिनर ठरत आहे. राशीद जगातल्या सगळ्यात जास्त टी-२० लीगमध्ये खेळत आहे. अफगाणिस्तानचा राशिद ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि भारतातल्या आयपीएलमध्ये खेळतो. ऑक्टोबर २०१५मध्ये राशीदनं अफगाणिस्तानकडून खेळताना झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
#Stump #Gonw #BPL17 #ComillaVictorians pic.twitter.com/yRGbsNu6j3
— Rashid Khan (@rashidkhan_19) November 15, 2017