अफगाण राष्ट्राध्यक्षांसोबत हा आयपीएल क्रिकेटर देश सोडून पळून गेला, दुसऱ्याने व्यक्त केली चिंता

Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर काही तासातच  (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेलेत.  

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2021, 07:09 AM IST
अफगाण राष्ट्राध्यक्षांसोबत हा आयपीएल क्रिकेटर देश सोडून पळून गेला, दुसऱ्याने व्यक्त केली चिंता title=
Pic Courtesy : twitter

काबूल : Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर काही तासातच  (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेलेत. त्यांच्यासोबत एक क्रिकेटपटूदेखील (Cricket News) पळून गेला. दरम्यान, आणखी एका खेळाडूने चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यांच्या खेळण्याबाबत आता साशंकता व्यक्त होत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, गनी यांच्यासोबत त्यांच्या जवळचे लोक होते, जे काबूलवर तालिबानच्या (Taliban) ताब्यापूर्वी पळून गेले. सर्वजण रशियन विमानाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये  (UAE)  पळून गेलेत. राष्ट्रपती गनी हे देश सोडणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये आहेत. 

क्रिकेटर नबी याचाही समावेश

'अफगाण इंटरनॅशनल'ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, तालिबानने सत्ता हाती घेण्याआधीच राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला आणि यूएईला गेले. राष्ट्रपतींची पत्नी रुला गनी, पूर्व अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि क्रिकेटपटू मोहम्मद नबी  (Mohammed Nabi) यांच्यासह त्यांचे जवळचे मित्रही त्याच्यासोबत फरार झालेत. 

या क्रिकेटपटूंच्या भविष्याबद्दल अनिश्चितता

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यामुळे राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammed Nabi) यांच्या आयपीएल सहभागावर लक्ष केंद्रित, केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी ताजिकिस्तानला पळून गेल्यानंतर तालिबानने अफगाण देशाची सत्ता ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना 

अफगाणिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती नवीन वळण घेत आहे. अफगाणचे प्रमुख क्रिकेटपटूंच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. विशेषत: राशिद खान आणि मोहम्मद नबी, जे 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामान्यांमध्ये खेळणार आहेत. त्यांनी त्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता आहे.

अशरफ गनी यांनी दिले स्पष्टीकरण  

'टोलो न्यूज'ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, दूतावासाने इंटरपोलला अशरफ गनी (Ashraf Ghani), हमदल्लाह मोहिब आणि फजल महमूद फाजली यांना सार्वजनिक मालमत्ता चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून ते पैसे अफगाणिस्तानला परत करता येतील. दुसरीकडे, अशरफ गनी यांनी पुन्हा एकदा देश सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी पैसे घेऊन पळून जाण्याचे आरोप फेटाळून लावले आहेत, असे म्हटले आहे की जर ते पळून गेले नसते तर देशात आणखी रक्तपात होऊ शकतो.