धोनी आणि मिताली राजनंतर आता 'या' क्रिकेटरवर येणार Biopic; राजकुमार हिरानी करणार डायरेक्ट

एमएस धोनी (MS dhonoi), मिताली राज (Mitali Raj), मोहम्मद अझरुद्दीन आणि प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्यानंतर आता लवकरच एका क्रिकेट खेळाडूवर बायोपिक येणार आहे. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय टीमसाठी अनेक संस्मरणीय आणि विजयी खेळी खेळल्यात. 

Updated: Feb 12, 2023, 07:13 PM IST
धोनी आणि मिताली राजनंतर आता 'या' क्रिकेटरवर येणार Biopic; राजकुमार हिरानी करणार डायरेक्ट title=

Rajkumar Hirani Will Make biopic on Cricketer: क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. एमएस धोनी (MS dhonoi), मिताली राज (Mitali Raj), मोहम्मद अझरुद्दीन आणि प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्यानंतर आता लवकरच एका क्रिकेट खेळाडूवर बायोपिक येणार आहे. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय टीमसाठी अनेक संस्मरणीय आणि विजयी खेळी खेळल्यात. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी या खेळाडूवर बायोपिक बनवणार आहेत.

दुसरा, तिसरा कोणी नाही तर हा बायोपिक माजी दिग्गज खेळाडू लाला अमरनाथ यांच्यवर बनणार आहे. अनेक मिडीया रिपोर्ट्सनुसार, हा बायोपिक डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या बायोपिकला एक्सेल एंटरटेनमेंट बनवणार असल्याची माहिती आहे. चाहते खासकरून क्रिकेट प्रेमी या बायोपिकसाठी उत्सुक आहेत, कारण प्रसिद्ध डायरेक्टर राजकुमार हिरानी हा सिनेमा बनवणार आहेत. 

लाला अमरनाथ यांचा बायोपिक 2019 मध्ये बनणार होता

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी लाल अमरनाथच्या बायोपिकची तयारी करतायत. मुख्य म्हणजे त्यांनी 4 वर्षांपूर्वी 2019 मध्ये या सिनेमाची योजना आखली होती. मात्र काही कारणांमुळे हा बायोपिक लांबणीवर पडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानसमोर की आणि लाला अमरनाथ यांच्या बायोपिकच्या दोन स्क्रिप्ट समोर ठेवल्याचं म्हटलं जातं. यापैकी शाहरुखने डंकीची निवड केली. यानंतर हिरानींनी आता त्यांच्या सहाय्यकांना लाला अमरनाथ बायोपिकची तयारी सुरू करण्यास सांगितले असून, स्क्रिप्ट फायनल केली जातेय.

लाला अमरनाथ यांच्या नावे असलेले रेकॉर्ड्स

  • माजी भारतीय क्रिकेटर लाला अमरनाथ यांच्या नावावर अनोखा रेकॉर्ड आहे. ते स्वतंत्र भारतीय क्रिकेट टीमचे पहिले कर्णधार होते.
  • लाला अमरनाथ हे एकमेव असे गोलंदाज होते ज्यांनी सर्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांना हिट विकेट आऊट केलं होतं.
  • लाला 1947-48 मध्ये भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार बनले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली टेस्ट सिरीजही जिंकली.
  • भारताच्या वर्ल्डकप विजयात मोहिंदर अमरनाथ हे प्रमुख खेळाडू होते. उपांत्य आणि अंतिम दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.