IND vs AUS : टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू दुसरी टेस्ट खेळणार नाही, 'हे' आहे कारण?

IND vs AUS : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करून उतरू शकतो.

Updated: Feb 12, 2023, 06:38 PM IST
IND vs AUS : टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू दुसरी टेस्ट खेळणार नाही, 'हे' आहे कारण? title=

Jaydev Unadkat Released : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील नागपूर कसोटी टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या टेस्ट सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू खेळणार नाही. बीसीसीआयने (BCCI) या खेळाडूबाबत एक निवेदन ही जारी करून माहिती दिली आहे. 

 

हे ही वाचा : दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर 

 

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) रविवारी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या संघातून सोडले आहे. उनाडकटला रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) फायनलमध्ये खेळण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याबाबत निवेदनही जारी केले आहे.

बोर्डाच्या निवेदनात काय? 

भारतीय क्रिकेट बोर्डाने जयदेव उनाडकडच्या (Jaydev Unadkat) दुसऱ्या कसोटी सामन्यातील अनुपस्थितीत बाबतचं कारण सांगितलं आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीसाठी जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तो आता सौराष्ट्र संघात सामील होणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. 

येत्या 16 फेब्रुवारीला कोलकात्ताच्या ईडन गार्डन्सवर बंगाल विरूद्ध सौराष्ट्र (Saurashtra vs  Bengal) संघात मास्टरकार्ड रणजी ट्रॉफीचा फायनल सामना रंगणार आहे.  या फायनल सामन्यासाठी सौराष्ट्रने (Saurashtra) पात्रता मिळवली होती.त्यामुळे त्याला या सामन्यासाठी दुसऱ्या टेस्टमधून सोडण्यात आले आहे.  

 

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं

 

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरूद्द पहिल्या टेस्ट सामन्यात दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीचे नाव होते. तर जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र आता रणजीच्या फायनल सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे. 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करून उतरू शकतो. ऑस्ट्रेलियन (Australia) संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत अजूनही शंका आहे. त्यामु्ळे तो दुसऱ्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघाना हे मोठे धक्के असणार आहेत.