राजकोट कसोटीत जाडेजाचा विंडीजला तडाखा

विराटनं भारताकडून सर्वाधिक १३९ धावा केल्या.

Updated: Oct 5, 2018, 03:10 PM IST
राजकोट कसोटीत जाडेजाचा विंडीजला तडाखा  title=

राजकोट : राजकोट कसोटीत टीम इंडियानं पहिला डाव ९ गडी गमावून ६४९ धावांवर घोषीत केला. पृथ्वी शॉ, विराट कोहलीपाठोपाठ रविंद्र जाडेजानंही शतक झळकावलं. कर्णधार विराट कोहलीनं कसोटी कारकिर्दीतील २४ वं शतक झळकावलं. कसोटीत २४ जलद शतक झळकावणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर तो दुसऱ्या स्थानी आहे. विराटनं भारताकडून सर्वाधिक १३९ धावा केल्या.

फॉलोऑनसाठी प्रयत्न 

 जाडेजा १०० धावांवर नाबाद राहिला. ऋषभ पंतचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं. भारतीय फंलदाजांनी राजकोटमध्ये विंडीज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आता विंडीजला फॉलोऑन देण्यावर भारतीय संघ प्रयत्नशील असेल.