भारतीय क्रिकेटरची सुपरमार्केटमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; संपूर्ण घटना CCTV कैद

काही कारणावरून पहिल्यांदा तिथल्या कर्मचाऱ्याशी शाब्दिक वाद झाला. वाद इतका वाढला आणि त्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

Updated: Dec 1, 2022, 09:30 PM IST
भारतीय क्रिकेटरची सुपरमार्केटमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; संपूर्ण घटना CCTV कैद title=

Rajeshwari Gayakwad fight: भारतीय महिला क्रिकेट टीममधील (India women's national cricket team) बेस्ट खेळाडूंमध्ये राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. राजेश्वरीने नुककंच तिच्या गोलंदाजीच्या जीवावर अनेक सामने भारताला टीमला जिंकवून दिलेत. मात्र आता राजेश्वरी गायकवाड एका वादामध्ये (Rajeshwari Gayakwad fight) अडकली आहे. एका सुपरमार्केटमध्ये कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची आणि मारहाण केल्याचा आरोप राजेश्वरीवर लावण्यात आला आहे.

31 वर्षांची राजेश्वरी गायकवाड सामान खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेली होती. यावेळी काही कारणावरून पहिल्यांदा राजेश्वरीची तिथल्या कर्मचाऱ्याशी शाब्दिक वाद झाला. वाद इतका वाढला की, यानंतर तिने काही लोकांसोबत सुपरमार्केटमध्ये घुसून त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाल्याने राजेश्वरीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

या प्रकारानतर सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं. शिवाय सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार करण्याचा त्यांनी विचार केला. मात्र नंतर दोघाकडूनही पोलीस तक्रार न नोंदवता सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आलं. 

विजयपूरचे आनंद कुमार यांनी माहिती दिली की, 'एफआयआर नोंदवण्यासाठी तसंच पुढचा तपास करण्यासाठी अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 

2014 मध्ये राजेश्वरी केला डेब्यू

डाव्या हाताची स्पिनर गोलंदाज गायकवाडने 19 जानेवारी 2014 मध्ये श्रीलंकेविरूद्ध वनडे सामन्यात भारताकडून डेब्यू केलं होतं. राजेश्वरी गायकवाड 2017 च्या महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय टीमचा भाग होती. त्यावेळी अंतिम फेरीत भारताला इंग्लंडकडून 9 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

त्या वर्ल्डकपमध्ये राजेश्वरीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 15 रन्स देत 5 विकेट्स घेतले होते. महिला वनडे वर्ल्डडकप स्पर्धेतील भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी मानली जातो.