जयपूर : राजस्थानने सवाई मान सिंह स्टेडियममध्ये आपल्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या टी-२० सामन्यात दिल्लीवर १० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ६ षटकांत ७१ धावांचे आव्हान दिल्लीला देण्याल आले होते. मात्र दिल्लीला केवळ ६० धावा करता आल्या.
या सामन्यात राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७.५ षटकांत पाच बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यावेळीच पाऊस झाला. पाऊस बराच काळ सुरु राहिल्याने दिल्लीचे लक्ष्य कमी करण्यात आले. दिल्लीला ६ षटकांत ७२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
राजस्थानच्या बेन लाफलिनने दोन षटकांत २० धावा दिल्या. जयदेव उनादकटने दोन षटकांत २४ धावा देताना एक विकेट घेतला. धवल कुलकर्णीने एका षटकांत केवळ चार धावा दिल्या. कृष्णाप्पा गौतमने एका ओव्हरमध्ये १० धावा दिल्या.
दिल्लीच्या ऋषभ पंतने १४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने २० धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेलने १२ चेंडूत १७ धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. क्रिस मॉरिसने सात चेंडूत दोन चौकार आणि एका चौकाराच्या मदतीने १७ धावा दिल्या.
राजस्थान-दिल्लीदरम्यानच्या सामन्यात पावसाने तब्बल दीड तास व्यत्यय घातला. राजस्थानचा स्कोर १७.५ षटकांत पाच बाद १५३ धावा असताना पाऊस आला. तब्बल दीड तास पावसाचा खेळ सुरु होता.