शेवटच्या ओव्हरनं बदललं गणित, या बॉलरने लखनऊकडून हिसकावला विजय

6 बॉलमध्ये 15 रन पण... या बॉलरने कॅप्टन के एल राहुलच्या हातून हिसकावला विजय, पाहा नेमकं काय घडलं

Updated: Apr 11, 2022, 08:58 AM IST
शेवटच्या ओव्हरनं बदललं गणित, या बॉलरने लखनऊकडून हिसकावला विजय title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील राजस्थान विरुद्ध लखनऊ सामना झाला. या सामन्यात लखनऊ टीमला थोडक्यासाठी पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान टीमने आपला तिसरा विजय मिळवला. तर लखनऊ टीमला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 

राजस्थानने 165 धावां केल्या तर लखनऊला 162 धावा करण्यात यश आलं. यंदाच्या हंगामात लखनऊचा दुसरा पराभव आहे. हाती आलेला विजय शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पलटली आणि घात झाला. 

शेवटची ओव्हर ठरली निर्णायक 

या दोन टीममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये ठरला. लखनऊला विजयासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. युवा बॉलर कुलदीप सेन राजस्थानकडून शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग करत होता.

मार्कस स्टॉइनिससारख्या तगड्या फलंदाजासमोर कुलदीप सेनने 15 धावा वाचवत राजस्थानला 3 धावांनी विजय मिळवून दिला. कुलदीप सेनने 4 ओव्हरमध्ये 35 धावा देत 1 विकेट घेतली. त्याचवेळी मार्कस स्टॉइनिसने 13 चेंडूत 38 धावा केल्या. मात्र लखनऊला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 

युजवेंद्र चहलने सर्वात जास्त 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 41 धावा देऊन त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. चहलने 4 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं नाव नोंदवण्यात आलं.