PBKS vs RR : राजस्थानचा 'रॉयल' एंड; पंजाब किंग्सचा 4 विकेट्सने केला पराभव

PBKS vs RR Indian Premier League 2023 : पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. 

Updated: May 19, 2023, 11:36 PM IST
PBKS vs RR : राजस्थानचा 'रॉयल' एंड; पंजाब किंग्सचा 4 विकेट्सने केला पराभव title=

PBKS vs RR Indian Premier League 2023 : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. राजस्थानने पंजाब किंग्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह राजस्थानचे एकूण 14 पॉईंट्स झाले आहेत. 

पडीक्कल आणि यशस्वी जयस्वालचं अर्धशतक

आजच्या या सामन्यात देवदत्त पडीक्कल यांनी अर्धशतक झळकावलं. जयस्वालने 36 बॉल्समध्ये 50 रन्स करत स्वतःची विकेट गमावली. यावेळी त्याने आपल्या खेळीत आठ फोर मारले. तर दुसरीकडे पडीक्कलनेही 51 रन्सची खेळी साकारली. 30 बॉल्समध्ये ही खेळी करताना त्याने 5 फोर आणि 3 सिक्स लगावले आहेत.

पंजाबने दिलेल्या 187 रन्सचा पाठलाग करताना जॉस बटलर शून्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजून जयस्वाल त्याची खेळी साकारत होता. कर्णधार संजू सॅमसन 3 बॉल्समध्ये 2 रन करून बाद झाला. देवदत्त बाद झाल्यानंतर हेटमायरने 46 रन्सची खेळी केली. अखेर झुरेलने विजयी सिक्स मारून राजस्थानला विजय मिळवून दिला.

दोन्ही टीम्सची प्लेईंग-11

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत बराड, राहुल चाहर, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, एडम जम्पा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल