Mumbai Indians IPL 2023 Playoffs : गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने ( Royal Challengers Bangalore ) सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभवा केला. आरसीबीच्या ( Royal Challengers Bangalore ) या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) प्लेऑफचा मार्ग खडतर मानला जातोय. मात्र मुंबईला प्लेऑफ गाठण्यासोबत पॉईंट्स टेबलमध्ये ( IPL Points Table ) दुसरं स्थान देखील गाठता येऊ शकणार आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे. पण हो एका समीकरणामुळे मुंबई इंडियन्सला पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठता येणार असून प्लेऑफच्या सामन्यात गुजरात टायटन्सशी मुकाबला होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू चौथ्या तर मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर आहे. आरसीबी आणि मुंबई य दोन्ही टीम्सचे पॉईंट्स 14 आहेत, मात्र आरसीबीचं रनरेट प्लसमध्ये असल्याने चौथ्या स्थानावर त्यांनी झेप घेतलीये. तर मुंबईचं नेट-रनरेट मायनसमध्ये असल्याने सध्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
मुंबई इंडियन्सचा अजून एक सामना बाकी असून तो सामना त्यांना सनरायझर्स हैदराबादशी खेळायचा आहे. हा सामना जर मुंबई इंडियन्स जिंकला तर त्याचे पॉईंट्स 16 होतील. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज त्याचा पुढचा सामना दिल्लीशी खेळणार आहेत, हा सामना सीएसके हरली तर त्याचे 15 पॉईंट्स राहणार आहे.
दुसरीकडे जर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांनी त्यांचा पुढील सामना गमावला तर त्याचे पॉईंट्स अनुक्रमे 15 आणि 14 च राहणार आहेत. अशा परिस्थितीत 16 पॉईंट्स असलेली मुंबईची टीम दुसऱ्या स्थानी झेप घेईल. तर पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स असणार आहे. तर या समीकरणामुळे रॉय चॅलेंजर बंगळूरूला मात्र प्लेऑफ गाठता येणार नाहीये.
मुंबईचे आतापर्यंत 13 सामने झाले आहेत. तर यापैकी 6 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. आता रविवारी 21 मे रोजी मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. जर मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर हैदराबादविरुद्ध मुंबईला किमान 79 रन्सने जिंकावा लागणार आहे.