T20 World Cup 2024 Team India: येत्या 5 जूनपासून टीम इंडियाच्या वर्ल्डकप मिशनला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू अमेरिकेला पोहोचले असून न्यूयॉर्कच्या मैदानावर लीगमधील 3 सामने या मैदानावर होणार आहेत. याशिवाय 1 तारखेला झालेला बांगलादेशाविरूद्धचा वॉर्म अप सामना देखील याच मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पीच आणि मैदानावर खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. शनिवारी झालेल्या सराव सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या मैदानाबाबत खेळाडूंशी चर्चा केली.
टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड नव्याने बांधलेल्या स्टेडियममधील खेळण्याच्या परिस्थितीबद्दल थोडे चिंतित आहेत. द्रविडने दुखापतीची भीती व्यक्त करत नवीन मैदानावर खेळताना खेळाडूंना सावध राहण्यास सांगितलंय. या स्टेडियमवर टीम इंडिया अनुक्रमे 5, 9 आणि 12 जून रोजी आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 15 जून रोजी टीम इंडियाचा सामना रंगणार आहे. हा सामना कॅनडाविरुद्ध अ गटातील असून फ्लोरिडाला खेळवला जाणार आहे.
राहुल द्रविड यांच्या म्हणण्यानुसार, "ग्राउंड थोडं नरम आहे. त्यामुळे मला वाटतं खेळाडूंना हॅमस्ट्रिंगची समस्या होण्याची अधिक शक्यता आहे. आम्हाला या ठिकाणी आम्हाला काम करावं लागणार आहे. याशिवाय खेळाडूंना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. राहुल द्रविड यांनी हे वक्तव्य एका व्हिडीओमध्ये केलं असून बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
द्रविड पुढे पुढे म्हणाले, “कधीकधी खेळपट्टी थोडी स्पंजी असते. पण मला वाटते की, आम्ही यासाठी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलं आहे. मला वाटतं की, आम्ही खूप चांगलं मॅनेजमेंट केलं आहे. आम्ही चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आम्ही अतिशय शानदार गोलंदाजी केली.
या मैदानावरील पीचबाबत बोलताना शिवम दुबे म्हणाला की, आमच्या खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असणार आहे. या ठिकाणी फलंदाजी करणे सोपे जाणार नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.