पी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय. 

Updated: Sep 25, 2017, 12:11 PM IST
पी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस title=

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय. 

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट सिंधूचा बॅडमिंटन कोर्टवर धडाका कायम आहे. तिनं 2017 बॅडमिंटन सीझनमध्ये तीन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलंय. त्याचप्रमाणे वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही तिनं सिल्व्हर मेडल जिंकण्याची किमया साधली. 

सिंधूच्या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तिच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीय. आता सिंधूला जर हा पुरस्कार मिळाला तर या पुरस्कारामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढण्यास मदतच होणार आहे.