आयपीएल २०२० चं संभाव्य वेळापत्रक तयार, पण प्रसारक नाराज

आयपीएल होणार की याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण बीसीसीआय IPL च्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहे.

Updated: Jul 20, 2020, 05:30 PM IST
आयपीएल २०२० चं संभाव्य वेळापत्रक तयार, पण प्रसारक नाराज title=

मुंबई : कोरोनामुळे जगात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक सामने रद्द झाले आहेत. पण बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत (IPL 2020) आयपीएलचं आयोजन करण्याची इच्छा आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत (IPL 2020 Timetable) आयपीएलसाठी संभाव्य वेळापत्रक तयार केले गेले आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यानचा ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन (BCCI) बीसीसीआयने हे वेळापत्रक तयार केले आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये होणारा (T20 world cup) टी -२० वर्ल्डकप रद्द झाला तरच आयपीएल होऊ शकतो. तसेच हा आयपीएल देशाबाहेर होऊ शकतो. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही प्रसारक वेळापत्रकावर खुश नाहीत. दिवाळीच्या आठवड्यात 14 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल सामने झाले पाहिजे अशी स्टारची इच्छा आहे. स्टार इंडियाला दिवाळीचा आठवडा जाहिरातींसाठी वापरायचा आहे.

बीसीसीआयच्या वेळापत्रकांना विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, दुपारी आयपीएल सामने होणार आहेत, ज्याचा रेटिंगवर परिणाम होईल.

स्टारने 5 वर्षांसाठी आयपीएलचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. स्टारला यावर्षी आयपीएलमधून 3300 कोटी टीव्ही, डिजिटल जाहिरातींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 8 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल संपल्यास टीम 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला जाऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही वर्षांत दिवाळीचे स्वरुप बदलले आहे आणि बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) च्या रेंटींग्ज या आठवड्यात विशेष नाहीत आणि म्हणूनच भारतीय संघाला दिवाळीचा ब्रेक देण्यात आला आहे जेणेकरून त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवता येईल.

अधिकाऱ्याने म्हटलं की, 'आम्ही स्टार इंडियाबरोबर बसून या विषयावर बोलू शकतो. आम्ही त्यांच्यासोबत बार्क रेन्टींगबद्दल बोललो आहोत. कारण ते फक्त आयपीएलच नाही तर भारतीय संघाचे इतर सामने देखील प्रसारित करतात. दिवाळीच्या आठवड्यात बार्कच्या रेटींग घट दिसून आली आहे, त्यामुळे आपली टीम या दरम्यान ब्रेक घेते.

खेळाडूंना केवळ ब्रेक मिळतोच असे नाही, तर देशातील सर्वात मोठ्या उत्सवात ते जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवतात. जर काही गोंधळ झाला असेल तर आम्ही ब्रॉडकास्टरबरोबर बसून कधीही त्यावर चर्चा करू शकतो. म्हणूनच दिवाळीच्या आठवड्यापर्यंत आयपीएल खेचले जात नाही.

या संदर्भात एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने म्हटसं की, 'जर शेवटचा आठवडा दिवाळीच्या आठवड्याशी जुळला असता तर त्याचा फायदा स्टार इंडियाला नक्कीच झाला असता पण फ्रॅंचायझीला तारखांबाबत काही देणंघेणं नसतं.'