न्यू ईयर पार्टीत Prithvi Shaw चा जल्लोष, 'मिस्ट्री गर्ल'सोबत झाला स्पॉट

Prithvi Shaw New Year Celebration :टीम इंडियाच्या (Team India) पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नवीन वर्षाचे सेलिब्रेशन उत्साहात केले आहे. पृथ्वीने मुंबईतील एका पबमध्ये नवीन वर्षाची पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो त्याने इन्टाग्रामवर शेअर केले होते.या पार्टीत तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. 

Updated: Jan 2, 2023, 04:37 PM IST
न्यू ईयर पार्टीत Prithvi Shaw चा जल्लोष, 'मिस्ट्री गर्ल'सोबत झाला स्पॉट title=

Prithvi Shaw New Year Celebration : टीम इंडियाच्या खेळाडूंपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जल्लोषात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेशनमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे टीम इंडियाचा (Team India) खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची. कारण पृथ्वी शॉसोबत या पार्टीमध्ये एक मिस्ट्री गर्ल (Mistry Girl) स्पॉट झाली आहे. आता ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.  

टीम इंडियाच्या (Team India) पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नवीन वर्षाचे सेलिब्रेशन उत्साहात केले आहे. पृथ्वीने मुंबईतील एका पबमध्ये नवीन वर्षाची पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो त्याने इन्टाग्रामवर शेअर केले होते.या पार्टीत तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. या मिस्ट्री गर्लची (Mistry Girl) आता चर्चा रंगली आहे. 

कोण आहे मिस्ट्री गर्ल?

पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो मिस्ट्री गर्ल (Mistry Girl) सोबत पोज देताना दिसला आहे. त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? अशी चर्चा आहे. ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून निधी रवी तापडिया (Nidhi Tapadia) आहे. ती अनेक प्रादेशिक चित्रपट आणि संगीत व्हिडिओंमध्ये दिसली आहे. दरम्यान ही तरूणी त्याची मैत्रिण असल्याचा संशय आहे. 

 

टीम इंडियात संधी नाही 

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफीत 2022-23 देखील त्याने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले होते. त्याने याआधी पांढऱ्या रंगाच्या बॉलमध्ये देखील अप्रतिम खेळ दाखवला होता. देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये तो चांगल्या धावा करतोय. मात्र टीम इंडियात (Team India)  त्याला संधी मिळत नाही आहे.शॉने जुलै 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध त्याने हा टी-20 सामना खेळला होता. तेव्हापासून तो संधीची वाट पाहत आहे. 

दरम्यान न्यूझीलंडच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी आणि त्यानंतर बांगलादेश एकदिवसीय आणि कसोटी दौरा तसेच 3 जानेवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या श्रीलंकेच्या घरच्या सामन्यांसाठी शॉची (Prithvi Shaw) निवड झाली नाही. त्यामुळे आता तो टीम इंडियात संधी मिळवण्याची वाट पाहत आहे. त्याला लवकरच संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.