Big Bash League 2022: प्रसिद्ध बिग बॅश लीगचा (BBL) उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. आज सिडनी सिक्सर्स (sydney sixers) आणि ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) यांच्यात खेळल्या गेलेल्या हाय स्कोअरिंग मॅचमध्ये ब्रिस्बेन हीटने सिक्सर्सचा 15 धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात चर्चेचा विषय राहिला मायकेल नेसर. नेसरने (Michael Nesser) या सामन्यात अप्रतिम झेल (Catch) टिपला. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. (Michael Neser Catch Jordan Silk Out or Not out? Watch the video and decide for yourself Big Bash League marathi news)
नॅथन मॅकस्विनीच्या (Nathan McSweeney) वादळी खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हीटने 224 धावांचा डोंगर उभारला. जोश ब्राउनने (Josh Brown) देखील 23 चेंडूत 62 धावा खेचल्या आणि सिडनी सिक्सर्सला (sydney sixers) बॅकफूटवर पाठवलं. त्यानंतर 225 धावांचा पाठलाग करताना सिडनीच्या बॅटर्सची दैणा उडाली.
आणखी वाचा - Rishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!
सिडनीच्या फलंदाजांना अखेरच्या 11 चेंडूत 26 धावांची गरज होती. 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूपर्यंत सिडनीच्या 7 गड्यांच्या बदल्यात 199 धावा केल्या होत्या. त्यावेळी जॉर्डन स्किल (Jordan Silk) मैदानात पाय रोऊन उभा होता. त्याने 21 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता जॉर्डन स्किलचा विकेट ब्रिस्बेनसाठी (Jordan Silk Wicket) महत्त्वाची होती. त्यावेळी 19 व्या ओव्हरमध्ये एक घटना घडली.
Michael Neser's juggling act ends Silk's stay!
Cue the debate about the Laws of Cricket... #BBL12 pic.twitter.com/5Vco84erpj
— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2023
दरम्यान, जॉर्डन स्किलने टोलवलेल्या बॉलवर मायकल नेसरने (Michael Neser) असंभव असा कॅच (Michael Neser Catch) पकडला. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच राहिलेत. कॅच पाहून हा कॅच योग्य होता का?, असा सवाल देखील उपस्थित होत असल्याचं दिसतंय. क्रिडाविश्वात एकच चर्चा होताना दिसतेय. बॅटर Out की Not out?, असा सवाल आता सोशल मीडियावर (Social Media Viral Video) विचारला जातोय.