रोहित शर्मासाठी टीम इंडियाचं दार बंद! BCCI ने नव्या जबाबदारीसंदर्भातील चर्चेसाठी बोलावलं

Rohit Sharma Future: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटलं होतं. मात्र सलग 10 सामने जिंकणाऱ्या संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 22, 2023, 03:22 PM IST
रोहित शर्मासाठी टीम इंडियाचं दार बंद! BCCI ने नव्या जबाबदारीसंदर्भातील चर्चेसाठी बोलावलं title=
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव झाला

Rohit Sharma Future: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तिसऱ्यांचा वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करता आली नाही. गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमममध्ये झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारताला 6 विकेट्स आणि 7 ओव्हर राखून पराभूत केलं. या पराभवाचा मोठा धक्का भारतीय खेळाडूंबरोबरच चाहत्यांनाही बसला आहे. पराभवाच्या या धक्क्यातू बाहेर निघण्याचा प्रयत्न खेळाडू आणि चाहतेही करत आहेत. याचदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याबरोबरच रोहित शर्माला बीसीसीआयने बैठकीसाठी बोलवलं असून पुढील 4 वर्षांसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसंदर्भातील नियोजनाबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.

रोहितसाठी संघाची दारं बंद

रोहित शर्माबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत यासंदर्भातील स्पष्टता बीसीसीआयला हवी आहेत. तसेच रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली एका कर्णधाराला पूर्णपणे तयार करावं अशी बीसीसीआयची इच्छा असून यासंदर्भातच बैठकीत चर्चा होईल असं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-20 क्रिकेटच्या संघाचा विचार करताना माझ्या नावाचा विचार केला नाही तरी मला काहीही हरकत नाही असं रोहितने आधीच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे.

नक्की वाचा >> 'मला कळत नाही की विकेट्सची गरज असताना रोहितने...'; WC Final नंतर माजी कर्णधाराला पडला प्रश्न

भारताच्या टी-20 संघामध्ये नव्या दमाच्या क्रिकेटपटूंना संधी दिली पाहिजे, असं रोहितचं मत आहे. रोहित शर्मा आता आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील करिअर काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2027 साली होणाऱ्या पुढील वर्ल्ड कपच्या वेळेस रोहित 40 वर्षांचा असेल. रोहित शर्मासाठी टी-20 संघाची दारं बंद झाल्यात जमा आहे. आता रोहित शर्मावर भारतीय संघासाठी एक नवीन कर्णधार घडवण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

नक्की वाचा >> 'तो बाद झाल्यानंतर...'; सूर्यकुमार यादवच्या संथ खेळीमुळे रोहित शर्माला खावी लागली बोलणी

नव्या खेळाडूंना प्राधान्य

यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. भारतीय संघ पुढील वर्षभरामध्ये 6 एकदिवसीय सामने खेळणार नाहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप आधीच रोहितला आता त्याचा टी-20 साठी विचार होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यावर त्याचा काहीच आक्षेप नव्हता. मागील एका वर्षात निवड समितीने तरुण खेळाडूंना प्राधान्य दिलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल निवड समिती आपलं हे धोरण बदलण्याच्या विचारात नाही."

नक्की पाहा >> 'कितने भी दुख आएं, कितने भी...'; भारत World Cup हरल्यानंतर शमीच्या पत्नीची प्रतिक्रिया! पाहा Video

कर्णधार शोधण्याचं आव्हान

आगामी आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर एकदिवसीय सामन्यांसंदर्भातील नियोजन केलं जाणार आहे. भारतीय संघासाठी दिर्घकालीन कर्णधार निवडण्याचं आव्हान बीसीसीआय समोर आले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून तिथे 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून त्यात रोहित खेळणार आहे.