Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या शूटींगदरम्यान पोलिसांची धाड; व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Hardik Pandya : सध्या सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये हार्दिक पंड्या एक जाहिरातीचं शूट करताना दिसतोय. मात्र यावेळी शूट सुरु असताना अचनाक पोलिसांनी छापा टाकल्याचं दिसून येतंय. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 6, 2023, 11:33 AM IST
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या शूटींगदरम्यान पोलिसांची धाड; व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ title=

Hardik Pandya : गुरुवारपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाला 8 तारखेला ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना खेळायचा आहे. मात्र यावेळी टीम इंडियाच्या एका खेळाडूसोबत मोठी घटना घडली आहे. हा खेळाडू हार्दिक पंड्या असून त्याच्या शूटींग दरम्यान ही घटना घडली आहे. 

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये हार्दिक पंड्या एक जाहिरातीचं शूट करताना दिसतोय. मात्र यावेळी शूट सुरु असताना अचनाक पोलिसांनी छापा टाकल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. 

व्हायरल झाला हार्दिक पंड्याचा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या समोर बसलेला दिसतोय. शूट सुरु होताना जसं एक्शन म्हटलं जातं तसं दुसऱ्या बाजूने पोलीस फ्रेममध्ये एन्ट्री करतायत. यावेळी पोलीस आल्यानंतर तातडीने कॅमेरे बंद करण्यासाठी सांगतात. 

दरम्यान ही संपूर्ण घटना जाहिरातीचाच भाग असल्याचा दावा केला जातोय. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेलनी नाही. पोलिस छापा टाकून जाहिरातीचं शूट बंद करण्यात सांगतात आणि हा व्हिडिओ संपतो. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते, याबाबत विविध तर्क-वितर्क काढतायत.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडिया खेळणार पहिला सामना

वर्ल्डकपला सुरुवात झाली असून यंदा सर्व सामने भारतात होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. टीम इंडिया 8 तारखेला या स्पर्धेला सुरुवात करणार आहे. चेन्नईमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित सेना उतरणार आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

कशी आहे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर

कसं आहे टीम इंडियाचं वर्ल्डकपचं शेड्यूल

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: रविवार, 8 ऑक्टोबर - चेन्नई
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान: बुधवार, 11 ऑक्टोबर - दिल्ली
  • भारत विरुद्ध पाकिस्तान: रविवार, 14 ऑक्टोबर – अहमदाबाद
  • भारत विरुद्ध बांगलादेश: गुरुवार, 19 ऑक्टोबर – पुणे
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड: रविवार, 22 ऑक्टोबर - धर्मशाला
  • भारत विरुद्ध इंग्लंड: रविवार, 29 ऑक्टोबर - लखनौ
  • भारत विरुद्ध श्रीलंका: गुरुवार, 2 नोव्हेंबर - मुंबई
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: रविवार, 5 नोव्हेंबर - कोलकाता
  • भारत विरुद्ध नेदरलँड्स: शनिवार, 11 नोव्हेंबर - बेंगळुरू