नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या क्रिकेट मैदानातून विश्रांती घेऊन आराम करत आहे. कारण श्रीलंके विरूद्ध होत असलेल्या ३ टेस्ट सामन्यांच्या सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तरीही तो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या ऑफिशिअल ट्वितर अकाऊंटवर आपला एक शानदार फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी तो ही नव्या बदलाची तयारी आहे, असे म्हणाला होता. आता त्याच्या फॅन्ससाठी आणखी एक बातमी आहे. पांड्याला स्टाईल मॅगझिन मॅक्सिम स्टीडच्या होमपेजवर जागा मिळालीये.
@hardikpandya7 stars on the cover of #MaximSteed this month.
--#HardikPandya #MaximIndia #Maxim pic.twitter.com/fqI7fJ9aIV— Maxim India (@MaximIndia) November 13, 2017
मॅक्सिम इंडियाकडून हा फोटो ट्विट करण्यात आलाय. यात हा स्टार खेळाडू ब्लेझरमध्ये आपल्या फेमस हेअर स्टाईलसोबत दिसत आहे. अशाच प्रकारचा स्टाईल फोटो पांड्याने काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. त्यानंतर टोलर्सनी त्याला ट्रोल केलं होतं. याआधी बीसीसीआयने त्याला आराम करण्यासाठी श्रीलंके विरूद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये विश्रांती दिली होती.