नवी दिल्ली : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्यांदा पिता बनला आहे. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रॉड्रिग्जने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या मुलीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रोनाल्डो ट्विटरवर लिहिलं आहे की, अलाना मार्टिनाचा आताच जन्म झाला आहे. जियो आणि अलाना दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. आम्ही सर्व खूपच आनंदी आहोत".
रोनाल्डो जुळ्या मुलांचा इवा आणि मातेओ यांचाही पिता आहे. या जुळ्या मुलांचा जन्म जून महिन्यातच झाला होता.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली पत्नी जार्जिना आणि सात वर्षांचा मुलगा क्रिस्टियानो ज्युनिअरचा फोटो अपलोड केला आहे.
स्पेनची मॉडेल जार्जिना रॉड्रिग्जला रोनाल्डो डेट करत आहे. या दोघांचं अद्याप लग्न झालेलं नाहीये. काही दिवसांपूर्वी जार्जिना गरोदर असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र रोनाल्डोच्या आईने या बातमीचं खंडन केलं होतं.
यापूर्वी जून महिन्यात रोनाल्डोच्या घरी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यावेळी रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांचा फोटो पोस्ट केला होता. या मुलांचं नाव इवा आणि मातियो ठेवण्यात आलं आहे.
आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करत रोनाल्डोने सोशल मीडियावर जाहीर केलं होतं की, आतापर्यंत तीन मुलांचा पिता बनलो आहे. मात्र, आता चौथ्यांदा पिता बनलो आहे.
Genes pic.twitter.com/ctVAuXhuzu
— Cristiano Ronaldo (@Cristiano) November 12, 2017
रोनाल्डोचा एक मुलगा ७ वर्षांचा आहे. पोर्तुगालच्या युरो २०१६ विजेता टीमचा कॅप्टन रोनाल्डो जून २०१० मध्ये क्रिस्टियानो ज्युनिअरचा पिता बनला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मोठा मुलगा सरोगेसीद्वारे जन्मला आहे. मात्र, या संदर्भात रोनाल्डोने अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.