Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: May 24, 2024, 10:50 PM IST
Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी title=
Pakistan T20 World Cup Squad

Pakistan squad for t20 world cup 2024 : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेला (T20 World Cup 2024) येत्या 1 जूनपासून प्रारंभ होणार आहे. क्रिकेटच्या महाकुंभाला आता सुरूवात होत असल्याने क्रिडाप्रेमी आनंदात आहेत. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याचा आज अखेरचा दिवस होता. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्थात पीसीबीने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केलाय. तर बाबर आझमच्या (Babar Azam) खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. तर मोहम्मद आमीर याचं संघात पुनरागमन झालंय.

अबरार अहमद, आझम खान, अब्बास आफ्रिदी, सॅम अयुब आणि उस्मान खान या खेळाडूंची टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. तर पीसीबीने राखीव जागा जाहीर केल्या नाहीत. मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम या दोन अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलंय. यंदाच्या 15 खेळाडूंपैकी 8 खेळाडू हे सिनियर आहेत.  

हॅरिस रौफला डच्चू

हॅरिस रौफ पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि नेटमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे. त्याला सहभागी होण्याची संधी मिळाली असती तर खूप चांगलं झालं असतं, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan T20 World Cup Squad) 

बाबर आजम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सायम अय्यूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.

पाकिस्तानच्या सामन्यांचं वेळापत्रक -

6 जून – यूएसए विरुद्ध पाकिस्तान, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस.
9 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क.
11 जून – कॅनडा विरुद्ध पाकिस्तान, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क.
16 जून – आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, सेंट्रल ब्रोवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा.