बेबी एबीला आऊट करताच खेळाडू संतापला, पाहा व्हिडीओ

बेबी एबीला आऊट करताच या बॉलरची जबर 'खुन्नस', पाहा मैदानात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Apr 14, 2022, 11:42 AM IST
बेबी एबीला आऊट करताच खेळाडू संतापला, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. 12 धावांनी पंजाबने विजय मिळवला. तर मुंबईचा स्टार बॅट्समन बेबी एबीचा मैदानात जलवा पाहायला मिळाला. त्याला धावा करण्यापासून रोखण्याचं पंजाबसमोर मोठं आव्हान होतं. राहुल चाहरची त्याने चांगलीच पिसं काढली. 

याचा बदल बॉलर ओडियन स्मिथने घेतला. त्याने बेबी एबीला गुगली बॉल टाकला. त्यावर बेबीने लाँग शॉर्ट खेळला आणि तो फसला. तो कॅट आऊट झाला. तो आऊट झाल्याचा पंजाब टीमला आनंद खूप मोठा होता. तर मुंबईच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. 

चाहच्या नवव्या ओव्हरमध्ये बेबीने धावा करून घेतल्या. तर 11 व्या ओव्हरमध्ये तो फसला. आऊट झाल्यानंतर स्मिथने त्याला खुन्नस दाखवली. मैदानातून जाताने स्मिथने रागात त्याला काहीतरी बोलला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.