हार्दिक पांड्यासाठी 96 धावा करणारा शुभमन नाही तर 'हा' खेळाडू 'Real Hearo'

96 धावा करूनही शुभमन गिल नाही तर या खेळाडूला हार्दिक मानतो 'Real Hearo', काय कारण जाणून घ्या 

Updated: Apr 9, 2022, 09:01 AM IST
हार्दिक पांड्यासाठी 96 धावा करणारा शुभमन नाही तर 'हा' खेळाडू 'Real Hearo' title=

मुंबई : आयपीएलमधील 16 वा सामना पंजाब विरुद्ध गुजरात होता. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने पंजाबवर विजय मिळवला आहे. शेवटच्या दोन बॉलनं सामन्याची बाजी पलटली. पंजाबच्या हातात असलेला विजय गुजरातने खेचून आणला. या विजयाचा शिल्पकार राहुल तेवतिया होता. 2 बॉलवर षटकार ठोकून त्याने गुजरातला विजय मिळवून दिला. 

गुजराकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलचं शतक थोडक्यासाठी 4 धावांसाठी हुकलं मात्र विजयाचं श्रेय राहुल तेवतियाला देण्यात आलं. एवढचं नाही तर हार्दिक पांड्याने गिलला रिअल हिरो म्हणण्याऐवजी श्रेय दुसऱ्याला दिलं. 

राहुल तेवतियाने जे केलं ते टीमसाठी खूप मोठी गोष्ट होती. टीमला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. त्याने उत्तम कामगिरी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज होती. 

तेवतियाने शेवटच्या 2 बॉलवर षटकार ठोकून विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने राहुल तेवतियाचं कौतुक केलं आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये गुजरातने तिसरा विजय मिळवला आहे. 

पंजाबच्या पराभवामुळे मयंक अग्रवाल नाराज झाला. जिंकत आलेला सामना शेवटच्या 2 बॉलमुळे गमवला त्यामुळे टीममधील खेळाडूंच्या हा पराभव जिव्हारी लागला.

मयंक अग्रवालला चार सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलचं समीकरणही बदललं. गुजरात पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आलं.