परविंदर अवानाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा क्रिकेटपटू परविंदर अवाना यानं प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. 

Updated: Jul 17, 2018, 08:13 PM IST
परविंदर अवानाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू परविंदर अवाना यानं प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. ३१ वर्षांच्या अवानानं ट्विटरवरून निवृत्तीची घोषणा केली. फास्ट बॉलर असलेल्या परविंदर अवानानं २० डिसेंबर २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर १ डिसेंबर २००७ साली अवाना पहिली प्रथम श्रेणी मॅच खेळला. क्रिकेट खेळतानाचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. आता तरुणांना संधी द्यायची हीच योग्य वेळ आहे, असं ट्विट अवानानं केलं.

२०१२ साली अवाना इंग्लंडविरुद्ध पुण्यात पहिली टी-२० मॅच खेळला. तर याच सीरिजमधल्या मुंबईत झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्येही अवाना टीममध्ये होता. पण या २ टी-२० मॅचनंतर अवाना भारताकडून खेळला नाही. २००७ ते २०१६ पर्यंत अवाना दिल्लीकडून खेळला. अवानानं २९.२३ च्या सरासरीनं १९१ प्रथम श्रेणी विकेट घेतल्या. झारखंडविरुद्ध अवाना शेवटची मॅच खेळला. आयपीएलमध्ये अवाना पंजाबकडून खेळला होता. २०१४ साली अवाना शेवटची आयपीएल मॅच खेळला. बंगळुरूमध्ये कोलकाताविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये अवाना पंजाबच्या टीममध्ये होता. या मॅचमध्ये कोलकात्याचा ३ विकेटनं विजय झाला होता.