'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...'

Rahi Sarnobat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण यावरुन आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबतने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं राहिने म्हटलंय.

राजीव कासले | Updated: Aug 2, 2024, 06:07 PM IST
'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...' title=

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ मेडल पटकावत महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं (Swapnil Kusale) इतिहास घडवला. तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये स्वप्निलने पदक मिळवून दिलं. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खासाबा जाधव यांनी कुस्तीत पहिलं ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलं होतं. आता असाच ऐतिहासिक पराक्रम करून स्वप्नील दुसरा मराठमोळा खेळाडू ठरलाय. स्वप्नील हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातला आहे. त्यामुळे त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर कोल्हापूरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

राज्य सरकारकडून बक्षीस जाहीर
पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केलं आहे. राज्य सरकारच्या वतीने स्वप्नील कुसळेला 1 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

राहि सरनोबतची खंत
स्वप्नील कुसाळेला जाहीर झालेल्या रकमेकवर भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबत (Rahi Sarnobat) हिने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वप्निलला घोषित झालेल्या बक्षिसाची रक्कम कमी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना सोसावा लागणारा खर्च खूप मोठा असल्याचं राहिचं म्हणणं आहे. सराव आणि नोकरीतील काम यांचा मेळ अवघड असल्याचं सांगत राहिने खेळाडूंच्या तांत्रिक अडचणी समजून घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची आवश्यकताही तीने बोलून दाखवलीय. 

राहिचा पगार थांबवला
राही सरनोबत हिला राज्य सरकारने ऑगस्ट 2014 नोकरी दिली, पण प्रोभेशनरी पिरेड पूर्ण केला नाही हे कारण देत 2017 पासून आजपर्यंत तब्बल 7 वर्षे एक रुपयाही पगार दिलेला नाही. राही सरनोबत हिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत 36 गोल्ड मेडल, 42 सिल्वर मेडल आणि 12 ब्राँझ मेडल मिळविले आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे यातील अनेक मेडल राहील सरनोबत हिने सरकारी नोकरी जॉईन केल्यानंतर मिळवलेत 

विरोधकांनी केली टीका
या मुद्द्यावर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. 
स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिक स्पर्धेआधी तयारीसाठी राज्य सरकारने  25 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे पैसे वेळीच दिले असते तर कदाचित स्वप्नीलला सुवर्ण पदक मिळालं असतं अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलीय. राही सरनोबत ला नोकरी दिली, प्रोबेशन पूर्ण केले नाही म्हणून तिला पगार थांबवलाय.. याला काय म्हणावे सांगा, नुसत्या घोषणा करून उपयोग नाही असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.