राहुल द्रविड आणि शोएब अख्तरमध्ये वाद, इंझमामला करावी लागली मध्यस्ती

शांत आणि संयमी असलेल्या राहुल द्रविडनं शोएब अख्तरसोबत का घातला वाद? नेमकं काय घडलं होतं?

Updated: Jun 2, 2021, 09:22 AM IST
राहुल द्रविड आणि शोएब अख्तरमध्ये वाद, इंझमामला करावी लागली मध्यस्ती title=

मुंबई: शांत आणि संयमी म्हणून ओळख असलेला राहुल द्रविड आणि दुसरीकडे पाकिस्तानचा आक्रमक वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात एकदा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी त्यावेळी इंझमामला मध्यस्ती करावी लागली होती. नेहमी संयमी असलेला राहुल द्रविड त्यावेळी शोएबसोबत वाद घातल होता. 

नेमकं काय घडलं?

भारत विरुद्ध सामन्यांमध्ये शोएब अख्तरचा आक्रमकपणा त्याच्या गोलंदाजीमधून दिसून येत होता. राहुल द्रविड क्रिझवर असताना शोएबनं टाकलेला बॉल त्याने टोलवला आणि तो बाउन्ड्रीपर्यंत गेला. त्यावेळी रन काढण्यासाठी राहुल द्रविड जोरात धावत होता, त्या दरम्यान त्याचा धक्का शोएब अख्तरला लागला. 

राहुल द्रविड रनसाठी धावत असताना त्याचा धक्का क्रिझवर मध्ये उभ्या असलेल्या शोएबला लागला. या मुद्द्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. राहुलने शोएबला वाटेतून बाजूला होण्यास सांगितलं. त्यावर शोएब खूप संतापला. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. 

पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम-उल-हकला वाढता वाद दिसला तेव्हा त्याने दोघांनाही वेगळे केले. हा सामना पाकिस्तानने 3 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राहुल द्रविडच्या 67 आणि अजित आगरकरच्या 47 धावांच्या मदतीने भारताने 200 धावा केल्या.