Saud Shakeel: पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG vs PAK) संघांत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना मुलतानच्या मैदानावर सोमवारी पार पडला. या सामन्यात एक नवा वाद (Saud Shakeel wicket) निर्माण झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 355 धावांचे लक्ष्य दिलं होतं. परंतु पाकिस्तान संघाचा डाव 328 धावांवर आटोपला. या सामन्यात पाकिस्तानच्या मैदानावर इंग्लंडने 22 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकण्याचा (Eng Beat Pak) पराक्रम केला आहे.(Pakistan vs England 2nd Test Whose fault exactly Shakil Out or Not out watch video marathi news)
साऊद शकीलने (Saud Shakeel) सामन्यात चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 63 धावा करणाऱ्या शकीलने दुसऱ्या डावातही 213 चेंडूत 93 धावांची संघर्षपूर्ण खेळ दाखवला. शकील मैदानात होता, तेव्हा पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं. त्यात शकीलच्या शतकाची (Saud Shakeel Missed Century) देखील अनेकांना प्रतिक्षा होती. मात्र, वुडनेही त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मात्र, शकीलचा विकेट वादात सापडला आहे.
दुसऱ्या डावात मार्क वूड (Mark Wood) गोलंदाजी करत असताना 94 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. दोन चेंडू ऑफला खेळवल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुल शॉट (Pull Shot) मारायला गेलेल्या शकीलचा नेम चुकला आणि चेंडू विकेटकीपर पोपच्या पारड्यात गेला. त्यावेळी उजव्या बाजूला ढायय मारत पोपने (Ollie Pope controversial catch) कॅच घेतला खरा पण चेंडू पुर्ण त्याच्या हातात पोहोचला नव्हता.
The ball that ended Saud Shakeel's fantastic innings. #PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/kssvis9RdH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 12, 2022
दरम्यान, गोलंदाजांच्या अपीलवर अँपायर्सने (umpire) शकीलला आऊट (Saud Shakeel Out) दिलं. त्यानंतर सध्या वाद निर्माण झाला आहे. शकीलच्या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. त्यानंतर आता अनेक क्रिडातज्ज्ञांनी शकील नॉट आऊट असल्याचं दिसतंय, असं म्हटलंय. त्यावरून वाद देखील निर्माण झालाय. त्यामुळे आता व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा... शकील Out की Not out?