'तु माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू',Virat Kohli कडून स्टार खेळाडूचे कौतूक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. खुप वेळानंतर त्याच्या बॅटीतून वनडे फॉरमॅटमध्ये शतक आले होते, 

Updated: Dec 12, 2022, 05:26 PM IST
'तु माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू',Virat Kohli कडून स्टार खेळाडूचे कौतूक title=

Virat kohli Support Ronaldo : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. खुप वेळानंतर त्याच्या बॅटीतून वनडे फॉरमॅटमध्ये शतक आले होते, त्यामुळे त्याच्या या शतकाची चर्चा होती. या शतकानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने एका फुटबॉलरला महान खेळाडू म्हटले आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात. 

विराट पोस्ट

विराट कोहलीने (Virat Kohli) फुटबॉल विश्वाचा बादशाह रोनाल्डोसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. या भावनिक पोस्टमध्ये त्याने लिहले की, 'तु या खेळासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी जे काही केले आहेस, त्यासमोर कोणतीही ट्रॉफी किंवा कोणतेही जेतेपद काही नाही आहे', असे म्हणत त्याचे कौतूक केले. 

विराट (Virat Kohli) पुढे म्हणाला, जेव्हा मी तुला खेळताना पाहतो, तेव्हा मला आणि जगभरातील अनेक लोकांना काय वाटते याचे कोणतेही विजेतेपद वर्णन करू शकत नाही. असे म्हणत त्याने मोरक्को (Portugal vs Morocco) विरूद्द पराभवानंतर त्याची पाठराखण केली. तसेच तुझ्याकडे देवाची देणगी आहे, असे देखील त्याने म्हटलेय. 

प्रत्येक वेळी मनापासून खेळणार्‍या माणसासाठी, माझ्याकडून खरा आशीर्वाद. तू माझ्यासाठी सर्व काळासाठी महान आहेस,असे त्याने शेवटी म्हणत रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) फुटबॉल कारकिर्दीचे कौतूक केले.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान रोनाल्डोसाठी (Cristiano Ronaldo) यंदाचा फुटबॉल वर्ल्ड कप शेवटचा होता. आणि या वर्ल्ड कपच्या (fifa world cup 2022) क्वार्टर फायनल सामन्यामध्ये मोरक्कोने पोर्तुगालचा (Portugal vs Morocco) 0-1 ने पराभव केला होता. या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. तसेच या पराभवानंतर रोनाल्डो (Cristiano Ronaldo Emotional) भावूक देखील झाला होता. यावेळी अनेक फॅन्सने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या कारकिर्दीचे कौतूक केले होते.