शोएबने म्हणतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सलमाननं पार पाडावी

पाकिस्तानचा क्रिकेटर शोएबला का आलंय बॉलिवूडच्या दबंग खानवर अचानक एवढं प्रेम...आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त

Updated: Jun 29, 2021, 05:46 PM IST
शोएबने म्हणतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सलमाननं पार पाडावी title=

मुंबई: पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने खास इच्छा बॉलिवूडच्या दबंग भाईकडे केली आहे. आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा शोएबनं सलमान खानकडे व्यक्त केली. त्यामुळे आता शोएबला सलमानवर अचानक एवढं प्रेम का उफाळून आलं अशी एका बाजूला चर्चाही सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सुरेश रैनानं आपली इच्छा व्यक्त केली. माझ्यावर जर बायोपिक बनला तर त्यात बॉलिवूडमधील अभिनेता नको दाक्षिणात्य अभिनेत्यानं भूमिका करावी असंही रैनानं म्हटलं होतं. आता त्यानंतर शोएबनंही आपल्यावर बायोपिक आला तर मुख्य भूमिका कोणी करावी याचा खुलासा केला आहे.

शोएब अख्तरला गोलंदाजीचा बादशाह आणि बॉलिवूडमध्ये सलमान या दोघांनाही चाहत्यांनी तुफान प्रेम दिलं. तेच प्रेम आणखी द्विगुणीत करण्यासाठी शोएबनं माझ्यावर बायोपिक झाला तर त्यात माझी भूमिका ही सलमान खाननं करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. शोएबच्या  या इच्छेनंतर अनेकांनी आश्चर्य़ही व्यक्त केलं. 

संबंधित बातम्या- चेन्नईच्या स्टार खेळाडूवर लवकरच बायोपिक? कास्टिंगसाठी दाक्षिणात्य अभिनेत्याला प्राधान्य

याआधी सुरेश रैनानं ही इच्छा व्यक्त केली. एक मुलाखती दरम्यान रैना म्हणाला की, 'मला दक्षिणेकडील कोणीतरी हवे आहे, जो माझी भूमिका करू शकेल. कारण माझ्यासाठी चेन्नई आणि सीएसके संघ किती महत्त्वाचा आहे हे दाक्षिणात्य अभिनेत्यालाच समजू शकतं. सूर्याने ही भूमिका करावी अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे की ते हे करू शकतात. दुलकर सलमानचा अभिनयही उत्कृष्ट आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही आमिर खानच्या कामाचं कौतुक केलं. तो म्हणाला की, आमिर खानची जादू अजूनही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर आहे. अख्तरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा मुलगा आमिर खानच्या फिल्म 'तारे जमीन पर' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अख्तरने लिहिले- आमिर खानच्या कामाची जादू अजूनही आहे.