जयपूर : गुरुवारी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ४०हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेचा प्रत्येक स्तरातून निषेध केला जात आहे. देशभरातून या हल्ल्याविरोधात प्रत्येकाच्या मनात तीव्र संताप आहे. या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण देशभरात निदर्शने केली जात आहेत. क्रीडाविश्वातही याचे पडसाद पाहायला मिळाले. पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आता मुंबई आणि मोहाली क्रिकेट संघटने पाठोपाठ राजस्थान क्रिकेट संघाने देखील पाउले उचलली आहेत.
Jaipur: Rajasthan Cricket Association (RCA) removes photos of Pakistani cricketers from Sawai Mansingh Stadium’s picture gallery. (16.02.2019) pic.twitter.com/OIrZlhacUD
— ANI (@ANI) 18 February 2019
राजस्थान क्रिकेट असोसिएशननेही असाच एक महत्त्वाची निर्णय घेतला आहे. सवाई मानसिंग स्टेडियममध्ये फोटो दालनात लावण्यात आलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच शुक्रवारीच १६ फेब्रुवारीला हे फोटो हटवण्यात आले.
या हल्ल्याच्या विरोधात पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली स्टेडियममधून देखील पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो हटवले आहे. हटवलेल्या फोटोंमध्ये शाहिद अफ्रिदी, वसिम अकरम, जावेद मियाँदाद आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी खेळाडू इम्रान खान यांचा समावेश आहे. मोहाली मध्ये २०११ च्या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा उपांत्य सामन्यात पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासोबत उभे खंबीरपणे आहोत. यासाठीच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले आहे. पीसीएचे खजीनदार अजय त्यागी हे पीटीआय सोबत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जुन्या क्रिकेट क्लबपैकी एक असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने देखील क्रिकेटर इम्रान खानचा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोच्या जागी आता विनोद मंकड यांचा फोटो लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.