PAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video

PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...

सौरभ तळेकर | Updated: Dec 28, 2023, 06:31 PM IST
PAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video title=
PAK vs AUS Couples Private Moment

Couples Private Moment Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (PAK vs AUS) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात (MCG) दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात देखील आघाडी मिळवली असून पाकिस्तानचा सुपडा साफ होणार असल्याचं चित्र आता समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देत पाकिस्तानचा डाव 264 धावांवर गारद झाला. त्यानंतर आता दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 241 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसात कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता हा सामना चर्चेत आला आलाय तो एका व्हिडीओमुळे...

सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र, कसोटी सामना हा कंटाळवाणा प्रकार असतो. हा सामना पाहण्यासाठी एक जोडपं आलं होतं. त्यांनी आपली निवांत कोपऱ्यावरची जागा पकडली अन् सामन्याचा आनंद लुटला. मात्र, कॅमेरामॅनने अँगल टिपून जोडप्यांची फजितीच केली. तरूणी आणि तरूणी एकमेकांना मिठी मारून बसले होते. मात्र, दोघांना मोठ्या पडद्यावर जेव्हा दाखवण्यात आलं तेव्हा दोघांची भंबेरी उडाली. त्यांनी तोंड लपवत बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

पाहा Video

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन) : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.