IND vs PAK : ज्या सामन्याची उत्सुकता तो सामना अखेर सुरु झालाय. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. चाहते या सामन्याची कधी पासून वाट पाहत होते. अखेर या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) टॉस जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अजून 4 वेळा भारत-पाकिस्तान ( India-pakistan ) एकमेकांशी भिडणार आहेत. यामध्ये एशिया कप आणि वर्ल्डकप या दोन्हीमध्ये भारत -पाकिस्तान ( India-pakistan ) एकूण 4 वेळा एकमेकांशी भिडणार आहेत.
2 सप्टेंबर रोजी भारत-पाक सामना होतोय. यामध्येच जर भारत-पाकिस्तान दोन्ही टीम्स एशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये क्वालिफाय केलं तर यानंतर दोन्ही टीम्स 10 सप्टेंबर रोजी एशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. अशातच जर दोन्ही टीम्स पुन्हा फायनलमध्ये पोहोचल्या तर एशिया कपमध्ये भारत - पाकिस्तान ( India-pakistan ) सामना 3 वेळा पहायला मिळणार आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ( Team India ) सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर जर टीम इंडिया आणि पाकिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कप 2023 चा सेमीफायनल किंवा फायनल मॅचही टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये खेळवला जाऊ शकतो.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.