Rahul Dravid VVS Laxman New Zealand Tour : T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा (team India) दारुण पराभव झाला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 169 धावांच लक्ष्य दिलं होतं. मात्र इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे टार्गेट पूर्ण केलं. 4 ओव्हरआधीच इंग्लंडला (IND vs ENG) विजय मिळवून दिला. यानंतर आता बीसीसीआयला (BCCI) न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
द्रविड ऐवजी एनसीएचा प्रमुख कोच
वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवन (Shikhar Dhawan) तर टी 20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे. याचबरोबर या दौऱ्यासाठी प्रशिक्षकांची टीम देखील दुसरी असणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासह संपूर्ण प्रशिक्षक टीमला विश्रांती देण्यात आली असून द्रविड ऐवजी एनसीएचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) न्यूझीलंड दौऱ्यावर प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार आहे.
वाचा : पुरूषांनी अजिबात दुर्लक्ष करू नका, sperm count कमी होण्याची 'ही' असतात लक्षणं
टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार
भारतीय संघ 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. याचबरोबर टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा संपूर्ण प्रशिक्षक स्टाफला देखील विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा हा बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी संघात पुन्हा परतेल. विराट आणि अश्विन देखील बागंलादेश दौऱ्यावर संघात परततील. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे, दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारताचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान सेमी फायलनमध्येच संपुष्टात आले. इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव केला.