श्रीलंका विरुद्धच्या मालिकेदरम्यान वाईट बातमी, या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

सध्या सर्वत्र क्रिकेट आणि क्रिकेट सुरु आहेत. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

Updated: Mar 11, 2022, 07:32 PM IST
श्रीलंका विरुद्धच्या मालिकेदरम्यान वाईट बातमी, या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : सध्या सर्वत्र क्रिकेट आणि क्रिकेट सुरु आहेत. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. मात्र या दरम्यान एका खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. (new zealand senior cricketer ross taylor played series against netherlands before retirment)
 
न्यूझीलंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉस टेलरने वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

टेलर पुढच्या आठवड्यात नेपियरमध्ये नेदरलँड दौऱ्यात न्यूझीलंड इलेव्हनसाठी खेळेल. कारण, टेलरला या महिन्याच्या शेवटी डच विरुद्धच्या समरोपाच्या सामन्याआधी वनडे सीरिजमध्ये खेळायचं आहे. टेलरने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.  

आता टेलर डच विरुद्ध नेपियरच्या मॅकलीन पार्क इथं 19 मार्चला दुसऱ्या एकदिवसीय सराव सामन्यात उतरणार आहे. यानंतर टेलर डच विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसेल. न्यूझीलंड इलेव्हन टीमकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. तसेच न्यूझीलंडसाठी अखेरच्या मालिकेआधी काही वेळ खेळायची संधी उपलब्ध झाल्याने टेलरने आभार व्यक्त केलं. 

रॉस टेलर भावूक

"नेपियरच्या माझ्या आवडत्या मैदानावर खेळण्यसाठी उत्सूक आहे. मी या मालिकेनिमित्त युवा खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्यास उत्सूक आहे.  माझ्या अनुभव युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल", असा आशावाद टेलरने व्यक्त केला.

न्यूझीलंड इलेव्हन नेदरलँड विरुद्ध 2 वनडे मॅच खेळणार आहे. हे दोन्ही सामने 17 आणि 19 मार्चला पार पडतील. यानंतर 21 मार्चला एकमेव टी 20 सामना पार पडेल.