मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमाची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या हंगामापासून 2 नवे संघ जोडले गेल्याने थरार आणखी वाढणार आहे. सर्व संघांनी या मोसमासाठी सराव सुरु केला आहे. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईकडून (Mumbai Indians) अनेक वर्ष खेळलेला घातक बॉलर 'यॉर्करकिंग' लसिथ मलिंगाची (Lasith Malinga) आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा फलंदाजांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. (ipl 2022 rr announced coaching staff rajasthan royals appointed to lasith malinga as a fast bowling coach)
मुंबईच्या पलटणकडून खेळलेला मलिंगाची राजस्थान रॉयल्सच्या (Rajsthan Royals Bowling Coach) गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मलिंगाने 11 वर्ष आयपीएलमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. यानंतर मलिंगाने गेल्या हंगामात आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आता मलिंगा राजस्थानसोबत कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.
मलिंगाची आयपीएल कारकिर्द
मलिंगाने आयपीएलमध्ये 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर अनेकदा मुंबईला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. आता प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने मलिंगाच्या अनुभवाचा फायदा हा युवा खेळाडूंना निश्चितच होईल. त्यामुळे या मोसमात आता राजस्थानचे गोलंदाज मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Lasith Malinga. IPL. Pink. #RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/p6lS3PtlI3
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 11, 2022