Mitchell Starc ने घेतलेल्या 'त्या' कॅचवरून नवा वाद; पाहा MCC चा नियम काय सांगतो?

Mitchell Starc Controversial Catch Ashes 2023 : अजून एका कॅचवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 2, 2023, 06:47 PM IST
Mitchell Starc ने घेतलेल्या 'त्या' कॅचवरून नवा वाद; पाहा MCC चा नियम काय सांगतो? title=

Mitchell Starc Controversial Catch Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या अॅशेज ( Ashes 2023 ) सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील सध्या दुसरा सामना सुरु असून या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथने ( Steve Smith ) जो रूटचा जो कॅच पकडला, त्यावरून मोठा गदारोळ माजला. अशातच या सामन्यात अजून एका कॅचवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

दुसऱ्या अॅशेस टेस्टच्या चौथ्या दिवशी मिचेल स्टार्कच्या ( Mitchell Starc ) कॅचवरून गदारोळ माजला. कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करत असताना बेन डकेटने एक शॉट खेळला. यावेळी फाईन लेगवर उभ्या असलेल्या स्टार्कने डावीकडे उडी मारून कॅच घेतला. मात्र ज्यावेळी त्याने हा कॅच पकडला तेव्हा स्लाईड होताना बॉल जमिनीला लागला. या कॅचनंतर भारतीय चाहत्यांना शुभमन गिलच्या कॅचची आठवण करत खडे बोल सुनावलेत. 

स्टार्कने घेतलेल्या कॅचवरून गदारोळ

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यात लॉर्ड्समध्ये खेळवल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टार्कने कॅचबाबत ( Mitchell Starc ) नवा वाद निर्माण झालाय. हा कॅच घेताच इंग्लंडच्या कॅम्पने जल्लोष सुरू केला. यावेळी डकेटही क्रीज सोडून माघारी जायला सुरुवात केली होती. 

मात्र दुसरीकडे मिशेल स्टार्कने कॅच घेतल्यानंतर बॉल जमिनीला लागल्याचं रिप्लेमध्ये दिसून आलं. दरम्यान मैदानावरील पंचांनी त्याला अऊट करार दिला. मात्र थर्ड अंपायरने त्याला नाबाद दिले. हा निर्णय पाहून कर्णधार पॅट कमिन्सही आश्चर्यचकित झाला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

MCC चा नियम काय सांगतो?

मिचेल स्टार्कच्या या कॅचवरून नवा वाद निर्माण होत असतानाच एमसीसीने याबाबत सफाई दिलीये. एमसीसीचा नियम 33.3 नुसार, जेव्हा फिल्डरचं बॉलवर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि त्याचा वेग पाहता कॅच योग्य असल्याचा करार दिला जातो. बॉल जमिनीला स्पर्श करत नाही, पण स्टार्कच्या कॅचमध्ये त्याचा स्वतःवर ताबा नव्हता हे स्पष्टपणे दिसून आलं. बॉल जमिनीलाही लागल्याचं पहायला मिळालं.