'अहंकारच तुला बुडवेल'; चाहते हार्दिक पांड्यावर भडकले

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादात सापडला आहे. 

Updated: Oct 8, 2019, 07:33 PM IST
'अहंकारच तुला बुडवेल'; चाहते हार्दिक पांड्यावर भडकले title=

मुंबई : भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादात सापडला आहे. झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर हार्दिक पांड्यावर टीका होत आहे. झहीर खान सोमवारी ४१ वर्षांचा झाला. झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचं ट्विट हार्दिकने केलं.

'वाढदिवसाच्या शुभेच्छा झॅक... माझ्यासारखाच तुपण बॉल मैदानाबाहेर मारशील, अशी अपेक्षा आहे,' असं ट्विट हार्दिक पांड्याने केलं. एका स्थानिक मॅचवेळी हार्दिक पांड्याने झहीर खानच्या बॉलिंगवर सिक्स मारला होता. हाच व्हिडिओ हार्दिकने शेयर केला आहे.

हार्दिक पांड्याने ट्विट केलेल्या या व्हिडिओनंतर त्याच्यावर निशाणा साधण्यात आला. 'तुझा अंहकारच तुला बुडवेल भावा... विनम्र हो मूर्ख नाही,' असं एक यूजर म्हणाला. तर 'बोलण्यापेक्षा हार्दिक चांगली कामगिरी करेल आणि झहीरप्रमाणेच भारताला वर्ल्ड कप जिंकवेल, अशी अपेक्षा आहे,' असं दुसरा चाहता म्हणाला.

'हा सर जडेजाचं पायरेटेड व्हर्जन आहे. जेव्हा झहीर खानची वेळ होती तेव्हा तो तुझ्यासारख्या बॅट्समनला एक बॉलवर दोनवेळा बोल्ड करायचा. बोलायची तमा बाळग,' अशी टीका हार्दिकवर करण्यात आली.

काहीच दिवसांपूर्वी हार्दिक पांड्यावर लंडनमध्ये पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. लवकरच मैदानात पुनरागमन करु, असा विश्वास पांड्याने व्यक्त केला आहे. पण पुनरागमनची तारीख मात्र पांड्याने सांगितली नाही.