पाऊसपाणी, दुखापत...तरीही तो डगमगला नाही, Neeraj Chopra पुन्हा सुर्वण कामगिरी

या गेम्समध्ये पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

Updated: Jun 19, 2022, 08:48 AM IST
पाऊसपाणी, दुखापत...तरीही तो डगमगला नाही, Neeraj Chopra पुन्हा सुर्वण कामगिरी title=

मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमध्ये झालेल्या कुओर्तने गेम्समध्ये अजून एक सुवर्णपदक पटकावलं आहे. या गेम्समध्ये पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने शनिवारी 86.69 मीटरपर्यंत भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केलीये. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा दुसऱ्यांदाच स्पर्धेत भाग घेत होता. नीरज चोप्राने टोबॅगोचा केशरन वॉलकॉट आणि ग्रेनेडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांना हरवून सुवर्णपदक जिंकलं. 

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटरपर्यंत भालाफेक केला, तर इतर दोन थ्रो फाऊल म्हणून करार देण्यात आला. नीरज चोप्रा देखील तिसऱ्या थ्रो दरम्यान दुखापतीतून बचावला कारण तो थ्रो फेकत असताना अचानक त्याचा पाय घसरला. पण नीरज चोप्रा पुन्हा उभा राहिला. नंतर कोणतीही रिस्क न घेता त्याने उरलेले दोन थ्रो घेतले.

नीरज चोप्राने मंगळवारी फिनलंडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर भालाफेक करून आपला राष्ट्रीय विक्रम मोडला. मात्र, या शानदार कामगिरीनंतरही त्याला केवळ रौप्यपदक जिंकता आलं.

या स्पर्धेतील सुवर्णपदक फिनलंडच्या ऑलिव्हर हेलेंडरने जिंकलं. हेलँडर 89.33 मीटर भालाफेक करण्यात यशस्वी ठरला. नीरज चोप्रा आता 30 जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगमध्ये सहभागी होणार आहे.