National Sports Awards 2022: क्रीडा पुरस्कारांची घोषणा! 'या' खेळाडूला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार खेळाडूंची नावंही जाहीर, वाचा संपूर्ण यादी

National Sports Awards 2022: क्रीडा विश्वातील आताची सर्वात मोठी बातमी, क्रीडा पुरस्कारांची घोषणा 30 नोव्हेंबरला पुरस्कार होणार प्रदान

Updated: Nov 15, 2022, 11:43 AM IST
National Sports Awards 2022: क्रीडा पुरस्कारांची घोषणा! 'या' खेळाडूला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार खेळाडूंची नावंही जाहीर, वाचा संपूर्ण यादी title=

National Sports Awards 2022: क्रीडा विश्वातील आताची सर्वात मोठी बातमी. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022  साठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  देशात सर्वोच्च मानल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyachand Khelratna Award) भारताचा स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलची (Achanta Sharath Kamal) निवड करण्यात आली. आहे. 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभात राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commenwealth Games) अचंता शरथ कमलने आतापर्यंत तब्बल सात गोल्ड मेडल,, तीन सिल्व्हर आणि तीन ब्राँझ मेडल पटकावली आहेत. एशियन चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये (Asian Games) देखील त्याने दोन ब्राँझ मेडल जिंकली आहेत. अचंता शरथ कमलच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा हा गौरव आहे. भारताच्या टेबल टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचाकडे पाहिलं जातं.

अर्जुन पुरस्कारांची यादी जाहीर
याशिवाय 25 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award) निवड करण्यात आली आहे. तसंच प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारांची (Dronacharya Award) देखील घोषणा करण्यात आली असून टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

क्रीडा पुरस्कारांची यादी

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार: अचंता शरत कमल

अर्जुन पुरस्कारांची यादी : सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबले (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन ( बॉक्सिंग), भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धीबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धीबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्यूडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सॅकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवळकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग), अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशु), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बैडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बैडमिंटन), स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (पॅरा बॅडमिंटन).

द्रोणाचार्य पुरस्कार : जीवनजोत सिंह तेजा (तीरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (लाइफटाइम कॅटेगरी): दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती)